कोल्हापूर

जिल्ह्यात एकावेळी 300 रुग्णांवर उपचार 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे काही गंभीर परस्थिती उद्‌भवलीच तर पूर्व तयारीचा भाग म्हणून शहरातील खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात येणार आहे. शहरातील जवळपास सात खासगी रुग्णालयांतून कोरोनावर उपचारांसाठी स्वतंत्र कक्षाची तयारी करण्यात येत आहे. यात कमीत कमी 10 ते 25 बेडचे कक्ष असून, जिल्हाभरात जवळपास 300 रुग्णांवर एकावेळी उपचार होतील. संशयित व बाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. कॅम्पीपाटील यांनी दिली. 

परदेशात जाऊन आलेल्या व्यक्ती शहरात आहेत. तसेच ग्रामीण भागातही आहेत. त्यांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घेण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सीपीआरमध्येही अनेकांची तपासणी सुरू आहे. ग्रामीण भागात कोणाला कोरोनासदृश लक्षणे असल्यास किंवा सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असली तरी त्यांच्यावर उपचार घेता यावेत. यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सेवा दिली जाणार आहे. संख्या वाढल्यास उपचारासाठी शहरातील सात रुग्णालयांत यात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, ऍस्टर, 
सेवा रुग्णालय, महापालिका आदी रुग्णालयांत कक्षात उपचार होतील. 

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्या 
कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावतो. अशात गर्दीत एखाद्या कोरोना व्यक्‍तीचा संपर्क झाल्यास त्यातून संसर्ग होण्याची चिन्हे असतात. त्यामुळे गर्दीच्या जागी जाऊ नये, असे शासकीयस्तरावर आवाहन केले आहे. त्यामुळे यात्रा, जत्रा, विवाह सोहळा, सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलेले जात आहेत. त्याला प्रत्येकाने प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. यातून संसर्गाचा धोका टाळता येणे शक्‍य होईल, असे डॉ. कॅम्पीपाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

Paithan Farmer: खरीप पिके करपली, कर्जाचा ताण वाढला; पैठण तालुक्यात ५२ वर्षीय शेतकऱ्याने संपवलं जीवन

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

SCROLL FOR NEXT