truck police car accident sangli district 
कोल्हापूर

मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या पोलिसांची थरारक कहाणी

विजय लोहार

नेर्ले (जि. सांगली) - काळ आला होता, पण वेळ आली न्हवती! मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या कासेगाव पोलिसांची ही कहाणी. दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो, अन्यथा आमचं काय झालं असतं? हे आम्हालाही कळलं नसतं. परमेश्वर आमच्या पाठीशी असल्याचं सांगत असताना कासेगाव पोलिस ठाण्याचे बिट अंमलदार बाळासो मंडले यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. बाळासो मंडले यांनी जीवघेणा व अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.

मंडले सांगतात, वेळ रात्री अडीच वाजण्याची. रात्र गस्तीसाठी मी व माझे सहकारी चालक सुनील पाटील, होमगार्ड कैलास पाटील यांच्यासह मालखेड फाट्यावरील आशियायी महामार्गावर बाजूला गाडी उभी करून थांबलो होतो. याच वेळी कराडहून एक ट्रक भरधाव वेगाने समोरील झाडांना घासत आमच्या गाडीच्या दिशेने आला. आम्हाला काही सुचण्याच्या आत आमच्या पोलिस गाडीच्या पाठीमागील बाजूस डाव्या बाजूला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आमची पोलिस गाडी उडून १२ फुटावर आमच्यासह महामार्गाच्या बाजूला पलटी झाली. दुसरे वाहन आम्हाला येऊन धडकेल या भीतीने आम्ही जीव वाचवत पलटी झालेल्या जीप मधून कसेबसे बाहेर पडलो. बाहेर आल्यावर ट्रक बघितला तर तो दूर रानात जाऊन अडकला होता. माझ्या पायाला तर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. ट्रकचालकाला देखील दुखापत झाली. त्याला मराठी येत नसल्याने त्याला कासेगाव पोलिस बोलावून दवाखण्यात दाखल केले. आमचं नशीब चांगलं होतं म्हणूनच आम्ही वाचलो.
 अपघातग्रस्त ट्रकचा  (क्रमांकके.ए.१८सी.५५९५)  चालक शिवमूर्ती याच्यावर अपघाताबाबत गुन्हा दाखल झाला आहे.  

पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या ट्रकमध्ये शेतीमालाचे मोकळे कॅरेट भरले होते. पोलिस जीपचे (क्रमांक एम.एच.१० एन.६३४) तब्बल तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जीप पूर्णतः चक्काचुर झाली. ट्रक चालक झोपेत असल्याने हा अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.


खाकीतली माणुसकी

अपघातग्रस्त जीपमधून बाहेर पडल्यानंतर बाळासो मंडले व पाटील यांनी सहकाऱ्यांची विचारपूस करीत ट्रक चालकाला खासगी दवाखण्यात उपचारासाठी दाखल केले.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

Banana Crop Damage: क्षणात होत्याचे नव्हते! वादळाने ४०० एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त; शेतकरी हवालदिल, लवंग परिसरात कोट्यवधींचे नुकसान

वाईट ब्रेकअप होऊनही सचिन पिळगावकरांनी निभावलं एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन !

SCROLL FOR NEXT