The truck rammed into the house 
कोल्हापूर

डोणोलीत ताबा सुटला, भरधाव ट्रक घरात घुसला  

सकाळवृत्तसेवा

बांबवडे : डोणोली (ता. शाहूवाडी) येथे बांबवडेहून कोल्हापूरला जाणाऱ्या भरधाव ट्रक वृद्ध पादचाऱ्यास उडवून रस्त्याकडेच्या घरात घुसल्याने घरासह दारात उभ्या केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. बाळू तुकाराम वंडकर असे जखमी वृद्धाचे नाव आहे. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. 

ट्रक (एमएच 09 एल 0229) घेऊन चालक राजेंद्र बाबूराव गौड (गडमुडशिंगी) आज सकाळी शित्तूर तर्फ मलकापूर येथे पशुखाद्य पोहचवून कोल्हापूरला परत जात होता. दरम्यान, डोणोलीजवळ भरधाव ट्रकने बाळू तुकाराम वंडगर (ऐतवडे) यांना जोराची धडक दिली तसेच पांडुरंग दौलू कुंभार यांच्या घराची संरक्षक भिंत तोडून दारातील दुचाकी, चारचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी (एमएच 09 झेड 281) व मोटार (एमएच 09 बी एम 9898) या वाहनांचे नुकसान झाले. गेटसह संरक्षकभिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

चालक राजेंद गौड हा दारू पिऊन ट्रक चालवत असल्याने त्याचा ताबा सुटल्याने अपघात झाला. या मद्यपी चालकास जमावाने चोप दिला. तपास पोलिस एम. के. पवार व संभाजी पाटील करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT