The Tusker Elephant From Chandgad Returned To Aajra Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगडमधील टस्कर हत्ती आजऱ्यात परतला

रणजित कालेकर

आजरा : महिनाभरापुर्वी चंदगड तालुक्‍यात गेलेला टस्कर पुन्हा परतला आहे. धनगरमोळा परिसरात शेतकरी गवत कापणी करताना त्यांना त्याचे दर्शन झाले. त्यामुळे गेले महिनाभर सुटकेचा निश्‍वास सोडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. दरम्यान, दोन टस्कर हत्तीमुळे तालुक्‍यात ऊस, नारळ, बांबु पिकांचे नुकसान झाले असून हत्तीने माद्याळ परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. 

वनविभागाने महिनाभरापुर्वी "एलिफंट गो बॅक' मोहीम राबविली होती. या वेळी एक टस्कर कानूरकडून चंदगड परिसरात गेला होता. गेले महिनाभर तो चंदगड तालुक्‍यात वावरत होता. त्यामुळे आजऱ्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. दरम्यान, तो टस्कर दोन दिवसांपुर्वी पुन्हा आजरा तालुक्‍यात दाखल झाला आहे.

धनगरमोळा परिसरात गवत कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचे दर्शन झाले. चाळोबा परिसरात असलेल्या टस्कराने देवर्डे व माद्याळ परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्याने माद्याळ येथील सुरेश शेळके व हनमंत शेळके यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यांने त्यांची दोन नारळाची झाडे जमिनदोस्त केली. त्याच्या वावराने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

धनगरबाडी तलावात "डुबक्‍या' 
आज सायंकाळी टस्कर धनगरबाडीच्या तलावात डुबक्‍या मारतांना वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना दिसला. त्याला बाहेर हुसकावण्याचे प्रयत्न कर्मचारी करत होते, पण यश आले नाही. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT