Twenty-Four Villages In Ajara Are Far From Corona Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आजऱ्यातील चोवीस गावे कोरोनापासून दूर

रणजित कालेकर

आजरा : 8 मे रोजी आजरा तालुक्‍यात शिरकाव केलेला कोरोना अद्याप थांबलेला नाही. तालुक्‍यातील 72 गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. काही गावांत समूह संसर्गाला सुरवात झाली आहे. हे चित्र एकीकडे असताना आजही तालुक्‍यातील 24 गावे कोरोनापासून दूर आहेत. ही दिलासा देणारी बाब असून कोरोनाचा वाढता प्रसार पाहता या गावांनी डोळ्यांत तेल घालून खबरदारी घ्यायला हवी. 

लॉकडाउन झाल्यानंतर तालुक्‍यात कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना ग्राम दक्षता समितीनी विशेष प्रयत्न केले. दरम्यान, पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणांहून चाकरमानी गावोगावी परतू लागल्यावर आजरेकरांच्या काळजाचे ठोके चुकले. मोठ्या प्रमाणात त्या वेळच्या रेडझोनमधून नागरिक गावी पतरले. यातूनच परजिल्हा व परगावाहून येणारेच कोरोना पॉझिटिव्ह निघाले; मात्र सध्या स्थानिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. 

दीड महिना तालुक्‍यात कोठेही सामूहिक संसर्ग नव्हता; पण या काही दिवसांत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सामूहिक संसर्गाला सुरवात झाली आहे. तालुक्‍यातील 72 गावांत कोरोना पोहोचला. या गावांत 759 इतकी बाधितांची संख्या आहे.

सर्वच गावांनी कोरोनाला रोखण्यासाठी गावपातळीवर विविध उपाययोजना राबविल्या असल्या तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यात 72 गावांना अपयश आले; पण तालुक्‍यातील मासेवाडी, कोरीवडे, कागीनवाडी, कानोली, सावरवाडी, गजरगाव, यमेकोंड, जेऊर, भावेवाडी, महागोंड, महागोंडवाडी, शिरसंगी, मोरेवाडी, खानापूर, पेठेवाडी, शेळप, पोळगाव, इटे, देऊळवाडी, आवंडी, सातेवाडी, सुळेरान, आंबाडे, किटवडे ही गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. सध्याची परिस्थिती पाहता या गावांनी कोरोनाला रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. 

विनामास्क कोणी फिरू नये
गावात पुणे-मुंबई येथून 214 जण आले होते. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. अधिक्षयण काळ संपल्यानंतर घरी पाठवण्यात आले. याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणे, विनामास्क व विनाकारण कोणी फिरू नये यासाठीची खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. 
- रचना होलम, आजरा पंचायत समिती सदस्य. 

सर्वाधिक रुग्ण असलेली गावे 
आजरा - 274, उत्तूर-54, भादवण-24, हालेवाडी-20, वाटंगी-17, शृंगारवाडी-17.

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT