Twenty-one foot Ganpati and Iranian mine! 
कोल्हापूर

एकवीस फुटी गणपती अन्‌ इराणी खण!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात एकवीस फुटी गणपतींची क्रेझ वाढत चालली; पण त्यांच्या विसर्जनाचा प्रश्‍न पुढे आला. त्यावरून महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळांत वादाचे प्रसंगही निर्माण झाले. सुरवातीच्या काळात या मूर्तींच्या विसर्जनाची जबाबदारी महापालिकेची नाही, अशीच भूमिका प्रशासनाने घेतली होती; मात्र समन्वयातूनच अखेर इराणी खणीचा पर्याय पुढे आला आणि येथे एकवीस फुटी मूर्तींचे विसर्जन सुरू झाले; पण पुन्हा खणीचे प्रदूषण आणि वाढत्या दुर्गंधीमुळे आंदोलन छेडले गेले. अखेर योग्य ती खबरदारी घेऊनच इराणी खणीत मूर्तींचे विसर्जन सुरू झाले.

पूर्वी उंच मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत केले जायचे. शिवाजी पुलावरून मूर्ती ढकलली की, झाले विसर्जन, असेच त्याचे स्वरूप असायचे. एक मूर्ती पुलाच्या कठड्यात अडकली आणि हा विषय संतापाचा बनला. उंच मूर्तींचे विसर्जन करण्यास पंचगंगा नदी सोयीची नाही, हे लक्षात येताच रंकाळा तलावाकडे मोर्चा वळला. तलावाच्या कठड्याजवळ ट्रॉली लावायची व मूर्ती तलावात ढकलून द्यायची हीच पद्धत विसर्जनासाठी अवलंबली गेली; पण रंकाळ्याची खोली कमी असल्याने तलाव मूर्तींनी लगेच भरू लागला; मात्र रंकाळाप्रेमींनी त्याला पहिल्यापासूनच विरोध केला. अखेर उंच मूर्तींच्या विसर्जनासाठी रंकाळ्यालगतच्या इराणी खणीची पाळी आली. 

मुळात इराण्याची खण म्हणजे नैसर्गिक संपदेची खाण. ती सदैव पाण्याने भरलेली दिसत असली तरीही खणीच्या मध्यभागी उताराचा रस्ता व दोन्ही बाजूला ३० ते ३५ फूट खोल पाणी आहे. या रस्त्याचा उपयोग पूर्वी खणीतील दगड बाहेर काढण्यासाठी होत होता. नंतर खण पाण्याने भरल्यानंतर हा रस्ताही पाण्याखाली गेला. उंच गणेशमूर्तींचे विसर्जन जसे सुरू झाले तसे खणीचे अस्तित्व धोक्‍यात येऊ लागले. खणीचे पाणी कुजले आणि गाळाने ती भरली.

परिसरात दुर्गंधीचा त्रास सुरू झाला आणि पुन्हा आंदोलनाला धार आली. त्यामुळे वारंवार स्वच्छता मोहिमेवर महापालिकेला भर द्यावा लागला. प्रत्येक वर्षी महापालिकेतर्फे एकवीस फुटी मूर्ती इराणी खणीतच विसर्जित करण्याचे आवाहन मंडळांना होऊ लागले. इतर शहरात मोठे कुंड उभारावे लागतात; मात्र कोल्हापुरात नैसर्गिक कुंडच उपलब्ध असल्याचे आवाहन करताना सांगितले जाऊ लागले. एकूणच एकवीस फुर्टी मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्‍न आता मिटला असला तरी खणीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठीही प्रयत्न झाले. 

पर्यायांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद
एकूणच आजवरच्या प्रवासात रंकाळाप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी घेतलेली खमकी भूमिका महत्त्वाची ठरली. कारण एकीकडे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आग्रह धरताना कायमस्वरूपी फायबरची मूर्ती, मूर्ती एक्‍स्चेंज असे विविध पर्यायही याच मंडळींनी गणेश मंडळांना दिले आणि गेल्या पाच-सहा वर्षांची आकडेवारी पाहता हे प्रमाण निश्‍चित वाढले आहे.

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT