twenty two corona infected people found in belgaum 
कोल्हापूर

ब्रेकिंग - बेळगावच्या 22 जणांना कोरोनाची लागण...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - जिल्ह्यात नव्या 22 रुग्णांची आज (ता.10) भर पडली. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात 107 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बाधित मुळचे बेळगावचे आहेत. अजमेर येथे गेले होते. ते परतल्यानंतर त्यांना निपाणीत क्वारंटाईन केले होते. त्यांचा अहवाल आज आला असून, पैकी 22 जणांना कोरोना लागण झाली आहे. बाधितांना निपाणीत ठेवल्याने जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोठे नवीन निर्बंधीत (कॅन्टेन्मेंट झोन) क्षेत्र केले जाणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडा 107

बेळगाव येथील रहिवाशी काही दिवसांपूर्वी राजस्थानला गेले होते. परत आल्यानंतर त्यांना 14 दिवस निपाणीत क्वारंटाईन केले. घशातील स्वॅब घेऊन प्रयोगशाळेला पाठविले होते. अहवाल उपलब्ध झाला असून, अजमेर दौऱ्यावरून परतलेल्या 22 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह 85 मध्ये नवीन 22 रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची आकडा 107 वर पोचला आहे. दरम्यान, कोरोना पाझिटिव्ह रुग्ण संख्येने बेळगावने शंभरचा आकडा पार केल्यामुळे क्रमवारीत बेळगाव जिल्ह्याने म्हैसूरला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोचले आहे.

पाच ते सहा जणांनी अजमेर दौरा केला

बाधितांचे अनुक्रमे वय 50, 38, 17, 60, 10, 14, 40, 63, 20, 56, 29, 60, 25, 3, 46, 50, 12, 14, 27, 8. 3, 6 असे आहे. 22 पैकी 16 महिला आणि 6 पुरुष आहेत. पहिल्यांदा टप्प्यात 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यामध्ये आणखी काही जणांचा भर पडू शकते. सर्वांना कोरोना कक्षात दाखल केले आहे. अन्य पाच ते सहा जणांनी अजमेर दौरा केला असून, त्यांच्यातही कोरोना झाल्याची लक्षणे दिसून आली आहे. त्या नमुन्यांकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 107 झाली आहे. त्यापैकी 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाने एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 70 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

US Airstrikes Iran : शस्त्रसंधी फसली! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हवाई हल्ले, इराणचे अस्तित्व संपवण्याचा ट्रम्प यांचा इशारा

Samosa: खुसखुशीत बाहेरचा थर अन् आत खव्याचा गोडवा... या समोशाची गोष्टच वेगळी, रविवारच्या भारी ब्रेकफास्टची खास रेसिपी

Pune News: काठमांडूमध्ये दोनशे भाविक अडकले! पुण्यातील ५२ जणांचा समावेश, परवाने मिळूनही चीनकडून व्हिसा नाही

SCROLL FOR NEXT