Two And A Half Lakh Assistance To Siblings Through Initiative From Kalkundrikar villagers Kolhapur Marathi News  
कोल्हापूर

कालकुंद्रीकरांच्या पुढाकाराने बहिण-भावाला अडीच लाख

अशोक पाटील

कोवाड : किटवाड (ता. चंदगड) येथे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या कृणाल व काजल या मुलांना समाजातून मदतीचे हात पुढे येत असल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे. कालकुंद्री ग्रामस्थांनी 2 लाख 50 हजारांची आर्थिक मदत करून दातृत्वाची ओंजळ पुढे केली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या मदतीने अनाथ झालेल्या मुलांच्या मायेचा धागा घट्ट झाला आहे. 

कृणाल व काजल यांचे मूळ गाव कालकुंद्री आहे. ही दोन्ही मुलं आई-वडिलांसह किटवाड येथे मामाच्या गावी राहत होती. आठ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर आई, आजीवर त्यांची जबाबदारी पडली; पण नोव्हेंबरमध्ये आईचे अचानक अपघाती निधन झाल्याने वयोवृद्ध आजीवर मुलांचा भार आला.

याची व्यथा "सकाळ' ने "थरथरणाऱ्या हातांनी संसाराला ठिगळं कशी लावू' या मथळ्याखाली मांडली. त्यानंतर समाजातील विविध स्तरांतून या मुलांच्या मदतीसाठी हात पुढे येऊ लागले. अनेकांनी या चिमुकल्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन करत मदत केली. त्यांच्या शिक्षणासह त्यांच्या राहण्या-जेवणाचीही व्यवस्था करण्याची चर्चा केली. रोख स्वरुपासह या मुलांच्या बॅंक खात्यावरही अनेकांनी आर्थिक मदत पाठवली आहे. 

कृणाल व काजलच्या अनाथपणाची बातमी समजताच कालकुंद्री ग्रामस्थांचेही मदतीसाठी हात पुढे सरसावले. सोशल मीडियावरून तरुणांनी मदतीसाठी हाक दिली. कालकुंद्रीच्या मुंबई ग्रामस्थांनी एक लाख 55 हजार व कालकुंद्री ग्रामस्थांनी 95 हजार अशी दोन लाख 50 हजारांची आर्थिक मदत या मुलांना करून माणुसकीचे दर्शन घडवले. आपले गावकरी कठीण प्रसंगी मदतीला आल्याने या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मायेचा ओलावा दिसत होता. ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने घरी जाऊन, मुलांचे सांत्वन करून मदत सुपूर्द केली. 

मुलांच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेणार 
कृणाल व काजल या अनाथ झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी अनेकांनी आर्थिक बळ दिले. त्यामुळेच एका चांगल्या रकमेच्या स्वरुपात आर्थिक मदत करता आली. आर्थिक मदतीसह आता मुलांच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT