Two and a half lakh plant on the banks of Kalamba lake 
कोल्हापूर

कळंबा तलावाच्या काठावर रुजली अडिच लाख रोपटी ः ,सामाजिक वनीकरणाचा उपक्रम

संजय दाभाडे

कळंबाः पर्यावरण समतोलासाठी करवीर सामाजिक वनीकरण विभागाने दोन लाख चाळीस हजार रोपांची लागवड केली आहे. तसेच वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान योजनेअंतर्गत करवीर तालुक्‍यातील 118 गावामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी विविध जातींच्या पावणेदोन लाख रोपांचे वाटप केले जाणार आहे. पंधरा दिवसांमध्ये कळंबा तलाव येथून 56 तर सदर बाजार वन विभाग नर्सरी मधून 30 अशा 86 ग्रामपंचायतींना एक लाख तीस हजार रोपे मोफत दिली आहेत. 
शेतजमिनींचे प्लॉट पाडून सिमेंट कॉंक्रीटची जंगले उभारली जात आहेत. रस्ते ,धरण, कालवे बांधले जात आहे. तसेच औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परिणामी विविध जातीच्या वृक्षांची तोड होऊ लागली आहे. त्याचबरोबर वनक्षेत्र नामशेष होऊ लागले असून पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने वसंतराव नाईक हरित योजना करवीर तालुक्‍यामध्ये राबवली जात आहे. 118 ग्रामपंचायतींना गावात व गायनामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकी पंधराशे पन्नास रोपांचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये जांभूळ, बांबू, सिल्वर, खैर, कांचन, आपटा, महारुख, लिंब, आवळा, बहावा, चेरी, चिंच, आवळा, गुळभेंडी, पाडळ, सावर, सिसू, गुलमोहर, पिवळा, चाफा ,केशिया ,पाम अशा अनेक औषधी सह देशी-विदेशी जातींच्या वृक्षांच्या रोपांचा समावेश आहे. 
दरम्यान ही रोपांची देवराई फुलवण्यासाठी सामाजिक वनीकरण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. नवीन रोप लागवडीसाठी त्यांनी पुन्हा विविध जातीच्या वृक्षांच्या वीस हजार बियांचे संकलन सुरू केले आहे. 

वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. वनसंपदा सांभाळली तर वायुप्रदूषण कमी होणार असून पर्यावरणाचे बिघडलेले निसर्गचक्र पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. 
-दिपक खाडे, वन विभागीय अधिकारी, करवीर वनक्षेत्र जि. कोल्हापूर

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT