Two and a half thousand and a half this problem was removed 
कोल्हापूर

अडीच हजार अडीच ही अडचण झाली दूर ः दोन जिल्ह्यातील प्रवास होणार विनाकटकट

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः उद्योगधंद्यांसाठी रोज कोल्हापुरातून इतर जिल्ह्यात ये- जा करण्यासाठी सुमारे अडीच हजार कामगारांना ई-पास देण्यात आला आहे. कोल्हापुरातून सांगली आणि पुन्हा कोल्हापुरात येण्यासाठी हे पास देण्यात आले आहेत. अद्यापही ई-पास देण्याचे काम उद्योग भवनातून सुरू आहे. एकूण ई-पासच्या 80 टक्के पास हे केवळ सांगली जिल्ह्यातून रोज ये-जा करण्यासाठी दिले गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी अत्यावश्‍यक कारण असल्याशिवाय परवानगी दिली जात नव्हती. मात्र उद्योग व्यवसाय सुरू राहण्यासाठी हे आवश्‍यक होते. उद्योजक आणि कामगार या दोघांचीही मागणी होती. कामगारांसाठी, उद्योग-व्यावसायिकांसाठी हे पास द्यावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून पुढे आली. यातून जिल्हा प्रशासनाने उद्योग भवनमध्ये हे पास देण्याची सुविधा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 17 जून ते 31 जूनपर्यंत पास दिले होते. आता तेच पास पुन्हा मुदत वाढवून दिले असल्याचे उद्योग भवन मधून सांगण्यात आले. 
रोज ये-जा करण्यासाठी हे पास असले तरीही उद्योग-व्यवसायासाठी तसेच कामगारांसाठीच हा पास एकाच वेळी दिला जात आहे. यातून अनेक कामगारांना सांगली जिल्ह्यातून कोल्हापुरात आणि कोल्हापुरातून सांगली जिल्ह्यात रोज ये-जा करता येत आहे. उद्योग भवनमध्ये हे पास आज ही दिले जात आहेत. ज्या व्यावसायिकांना-कामगारांना परजिल्ह्यात कामानिमित्त जायचे आहे, त्यांनी ओळखपत्र, कंपनीची माहिती देणे आवश्‍यक आहे. आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीने मोफत पास दिला जात आहे. 

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय, नोकरीसाठी जाणाऱ्या सुमारे अडीच हजार कामगारांना आमच्याकडून ई-पास देण्यात आले आहेत. अडीच हजार पैकी 80 टक्के व्यक्ती या सांगली जिल्ह्यातून ये-जा करीत आहेत. 
सतीश शेळके, महाव्यवस्थापक, उद्योग भवन

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT