कोल्हापूर

जिल्ह्यातील अडीच हजार परप्रांतीत विद्यार्थी गेले गावाला 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने परप्रांतीय गावी परतले. त्यांची मुलेही गावी गेली आहेत, त्यामुळे औद्योगिक वसाहतीजवळ असणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका शाळांमधील पटसंख्या कमी होणार आहे.

या परिसरातील खासगी शाळांवरही याचे परिणाम जाणवण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील उर्दु शाळांतही परप्रांतीय कामगारांची मुले शिकतात मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांत मिळून परप्रांतीय कामगारांची सुमारे दोन ते अडीच हजार मुले, मुली शिक्षण घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. 
शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात 56 हजार परप्रांतीय कामगार आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती, इचलकरंजी, जयसिंगपूर, टोप, शिये, भुये, गोकूळ शिरगाव, जयसिंगपूर, हातकणंगले तालुक्‍यातील काही गावे, कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, शिरोली (पुलाची), शहरातील झोपडपट्टी लगतचा परिसर या ठिकाणी परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक आहे. येथील कारखान्यांत ते काम करतात. त्यांची मुले याच परिसरातील शाळांत जातात. जिल्ह्यात हिंदी माध्यमाची एकच माध्यमिक शाळा इचलकरंजीला आहे. त्यामुळे हे परप्रांतीय विद्यार्थी स्थानिक मराठी शाळांतच जातात. बहुतांशी विद्यार्थी हे महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांत शिकतात. 
लॉकडाउनमुळे या कामागारांचे काम थांबले. ज्यांचे स्वतःचे घर नाही तसेच फारशी साधने जवळ नाहीत असे कामगार गावी परतले. त्यामुळे सुमारे दोन अडीच हजार विद्यार्थीही पालकांसोबत परतल्याची शक्‍यता आहे. हे विद्यार्थी परतणार की नाही? आले तर ते पहिले सत्र झाल्यावर येतील अशा शक्‍यता वर्तवल्या जात आहेत. 

परप्रांतीय कामगारांचे प्रमाण अधिक असणाऱ्या भागातील शाळांत त्यांची मुले जातात. ही मुले त्यांच्या गावी परतल्याने या शाळांमधील पटसंख्येवर परिणाम जाणवेल. गावी गेलेले कामगार परतही येतील मात्र ते पहिल्या सत्रात येतीलच असे नाही. त्यामुळे शासनाने पटसंख्येनुसार संचमान्यता या वर्षी करून नये. 
- विनायक सपाटे , मुख्याध्यापक, नाकोडा हिंदी हायस्कूल, इचलकरंजी. , असे आवाहनही केले गेले आहे. त्याशिवाय प्रतिकारशक्ती वाढवण्यावर घराघरांत भर दिला जातो आहे. त्याचाही हा परिणाम असावा, असे डॉ. आदित्य काशीद सांगतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT