two brothers rape on Minor girl in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर हादरले ; तिच्या असहायतेचा फायदा घेत सख्या भावांकडून सलग दोन वर्षे आत्याचार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिची अश्‍लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघा सख्ख्या भावांसह सहा जणांना आज अटक केली. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. शहरातील एका भागात हा प्रकार घडला आहे.

याबाबत आज मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमुख संशयित शुभम रमेश कोळी (वय २७) आणि त्याचा भाऊ वैभव कोळी (२५, रा. ई वॉर्ड, पोलो ग्राउंडजवळ, रमणमळा) यांना अटक केली. याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. 

शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळी भावांनी बोलावलेल्या मित्रांनीही मुलीबरोबर अश्‍लील छायाचित्रे काढली आहेत. त्यामुळे पोलिसांनी केतन कृष्णा जाधव (२७, रा. न्यू पॅलेसजवळ, नाईक मळा), विजय विलास देवणे (३२, रा. साईनाथ तरुण मंडळजवळ, न्यू पॅलेसजवळ, मूळ रा. भुईगड, ता. शाहूवाडी), सुनील यमाजी पिंगळे (२६, भोसलेवाडी), शेखर महादेव मधारे (२२, राधानगरी गावठाण गल्ली, राधानगरी) यांनाही अटक केली. आणखी एक संशयित असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी सांगितले, की सन २०१७ ते २०१९ दरम्यानच्या काळात फिर्यादी राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील घरात शुभम रमेश कोळी याने फिर्यादीच्या मुलीच्या अज्ञानपणाचा व एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी जवळीक केली. त्यांची छायाचित्रे स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतली. ती छायाचित्रे सर्वत्र व्हायरल करतो, अशी धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी त्याने त्याचे मित्र केतन जाधव, विजय देवणे, सुनील पिंगळे, मोहन नाईक तसेच शेखर (पूर्ण नाव माहिती नाही) यांना बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यांनाही तिच्याशी जवळीक करण्यास सांगून त्याचीही छायाचित्रे घेतली. भाडेतत्त्वावरील घरीच शुभमचा भाऊ वैभव रमेश कोळी याने फिर्यादीच्या मुलीची छायाचित्रे व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. वैभव यानेही तिच्यावर बलात्कार केला. तीन जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलीच्या अज्ञानपणाचा व एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी तातडीने सहा जणांना अटक केली. 


उपअधीक्षक कट्टे यांचा पीडितेशी संवाद
घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. आई आणि मुलीशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन तातडीने अटकेची कारवाई करण्यात आली. 


तीव्र संताप
या दोघींच्या असहायतेचा फायदा घेऊन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. अश्‍लील छायाचित्रे काढून ती व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे त्या सर्वांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT