Two Crore Road Ready; But ... Panhala Road Problem Remains Kolhapur Marathi News
Two Crore Road Ready; But ... Panhala Road Problem Remains Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

दोन कोटींचा रस्ता तयार; पण... पन्हाळा मार्गाचे कवित्व कायम

आनंद जगताप

पन्हाळा ः गतवर्षीच्या ऑगस्टमध्ये अतिपावसामुळे पन्हाळा ते बुधवार पेठ रस्ता खचला, दरडीचे मोठमोठे दगड घसरून रस्त्यावर आले. त्यामुळे पन्हाळगडी येणारा एकमेव रस्ता बंद झाला होता. तालुक्‍याचे ठिकाण आणि पर्यटन स्थळ म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने डागडुजी करून तात्पुरता रस्ता हलक्‍या वाहनांसाठी सुरू केला.

पुढे लोकप्रतिनिधी, राज्याचे मुख्य सचिवांनी रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी रस्त्यासाठी साधारण दोन कोटी 20 लाख रुपये मंजूर केले. आणि तब्बल दहा महिन्यांनंतर हा रस्ता आता पक्‍का झाला आहे. परंतु, दरडीचे दगड अद्याप निखळलेल्या अवस्थेत तसेच असल्याने आणि या पावसाळ्यात हे दगड निसटण्याची शक्‍यता असल्याने पुन्हा रस्ता बंद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

या मुख्य रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या दरडीमागे वनखात्याचा रेडेघाट परिसर आहे. परिसर विस्तीर्ण आणि पांढऱ्या तांबड्या शाडूचा असल्याने या परिसरात पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साठते, मुरते ते वाहून नेण्यासाठी लता मंगेशकर बंगला ते रेडेघाटीपर्यंत मोठी गटार खोदली होती. परंतु, ही गटार शाडू, माती पडून उथळ बनल्याने परिसरातील सर्व पाणी दरडीवरून मुख्य रस्त्यावर येते आणि त्यामुळेच हा परिसर खचत असून, दरडीच्या मोठमोठ्या शिळा कोसळत आहेत.

जोपर्यंत हे वरचे पाणी पूर्णपणे निर्गत होणार नाही, तोपर्यंत या परिसरात भूस्खलन हे होतच राहणार, दगडे घसरतच राहणार नि दरवर्षी पावसाळ्यात रस्ता बंद होणार हे निश्‍चित. त्यातच पन्हाळा नाक्‍याजवळील ड्रेनेजचे काम अपुरे असल्याने या पाण्यामुळे मंगळवार पेठ, नेबापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तटबंदी कोसळत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी सांगूनही अद्याप हेही काम झालेले नाही. 

यावर्षीही कसोटी लागणार 
पन्हाळा-बुधवार पेठ रस्ता दुरुस्तीसाठी आणखीन एक कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजते. परंतु, आता पावसाळा जवळ आल्याने येथून पुढे काम करता येणे शक्‍य नसल्याने यावर्षीही पन्हाळावासीयांची कसोटी लागणार आहे. 

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT