Two Dogs Were Stolen In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजमधील दोन श्‍वान चोरीला

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : तुम्ही, घरी किंमती श्‍वान बाळगताय तर सावधान...! कुटूंबातील एक सदस्य मानून जीवापाड प्रेम करून वाढवलेल्या अशा श्‍वानांवर आता चोरट्यांची नजर पडत आहे. गडहिंग्लज शहरासह तालुक्‍यातील महागाव येथून प्रत्येकी एक श्‍वान चोरीला गेला आहे. यामुळे श्‍वान पालकांना आता दक्ष रहावे लागणार आहे. अशा किमती श्‍वान चोरांची टोळी असण्याची शक्‍यता वर्तविली जात असून पोलिसांनी त्यांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

शहरासह तालुक्‍यात मोटरसायकल, मोबाईल आणि आता श्‍वानांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी केवळ घरफोडी आणि पाकीटमाराचे प्रमाण अधिक होते. आजही या चोऱ्यांचे प्रमाण असले तरी लोकांनी सतर्कता बाळगायला सुरूवात केल्यानंतर चोरटेही चोरीचे पर्यायी मार्ग शोधत असताना पहायला मिळत आहेत. मध्यंतरी मोटरसायकल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यानंतर गर्दीच्या ठिकाणी किमती मोबाईल चोरणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली.

आठवडा बाजारासह इतर कार्यक्रमातील गर्दीचा फायदा घेवून आतापर्यंत शेकडो मोबाईल हातोहात लंपास करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मोबाईल चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना अपयश आल्याचे चित्र आहे. मोबाईल पाठोपाठ आता किंमती श्‍वानांवर चोरट्यांची नजर पडल्याचे चित्र आहे. अनेक कुटूंबामध्ये श्‍वान पाळण्याची हौस सध्या वाढीला लागली आहे. त्यातही विदेशी जातींचे श्‍वान पाळण्याकडे हौशी श्‍वानपालकांचा ओढा आहे.

या श्‍वानांच्या किमती 15 ते 20 हजारापासून लाखांच्या घरात असतात. अशा श्‍वानांवर जीवापाड प्रेम करून त्यांना कुटूंबातील एक सदस्यच करून घेतले जाते. कुटूंबातील लहानांपासून वृद्धापर्यंतच्या सर्वांना या विदेशी श्‍वानाचा लळा लागलेला असतो. त्याची देखभालही अगदी काळजीपूर्वक केली जाते. त्याला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. त्यात जर असे श्‍वान चोरीला गेले किंवा हरविले तर सारे कुटूंबच दु:खात बुडते. अशा श्‍वानांवर आता चोरट्यांची नजर पडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. 

फ्रेंच बुल्डॉग, मुधोळ हाऊंडची चोरी 
गडहिंग्लज शहरातून पंधरावड्यापूर्वी फ्रेंच बुल्डॉग या जातीचा श्‍वान चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. त्याची किमत 50 हजारावर आहे. श्‍वान पालकांनी या श्‍वानाचा शोध घेतला. परंतु अद्यापही त्याचा पत्ता लागलेला नाही. त्यानंतर दोन दिवसापूर्वीच महागाव येथूनही 35 ते 40 हजार रूपये किमतीचा मुधोळ हाऊंड जातीचा श्‍वान चोरीला गेल्याचा संशय आहे. अशा चोरट्यांचा शोध घेवून पोलिसांनी संबंधितावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT