two door closer for radhanagari dam 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक बातमी; राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद 

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राधानगरीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली असून धरणाच्या चार स्वयंचलित दरवाजांपैकी दोन दरवाजे आज पहाटे बंद झाले. सध्या दोन दरवाजे खुले आहेत. मात्र यामुळे भोगावती व पर्यायाने पंचगंगेचा पूर हळूहळू ओसरण्यास सुरुवात होणार आहे.

गेल्या चार दिवसाच्या पावसाच्या आक्रमक पवित्र्यामुळे राधानगरी धरण झपाट्याने भरले. गुरुवारी सायंकाळी दोन आणि मध्यरात्री दोन असे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू असल्याने पंचगंगेला महापूर आला होता. आज पहाटे साडेपाच वाजता चार पैकी क्रमांक सहाचा दरवाजा बंद झाला. तर पाठोपाठ सात वाजून पाच मिनिटांनी क्रमांक 3 हा दरवाजा बंद झाला. यामुळे विसर्गाची निम्म्याने घट झाली आहे. 

सध्या धरणाची पाणी पातळी 346.92  इतकी आहे. सुरु असलेल्या दोन स्वयंचलित दरवाज्यातून व पायथ्याच्या वीज निर्मिती गृहासाठी असे एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आज सकाळपासून पावसाची उघडझाप असल्याने महापूर ओसरण्यास आता हळू हळू सुरुवात होणार आहे. परंतु, पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पूरस्थिती होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४४ फूट ६ इंच इतकी आहे. तर ८५  बंधारे पाण्याखालील आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी; ५ ते ६ किमीपर्यंत रांग

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT