two drowned in the right canal at Panori kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : पनोरी येथे उजव्या कालव्यात दोघे जण बुडाले

सकाळ वृत्तसेवा

सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथे उजव्या कालव्यात दोन व्यक्ती बुडाल्या. सुरेश धोंडीराम भोसले (वय ४२ ) आणि विठ्ठल ज्ञानू शिंदे (वय ५०) असे मृतांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेले असता पाय घसरून पडल्याने ही घटना घडली. घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

 घटनेचा तपशील असा, येथील सुरेश भोसले व विठ्ठल शिंदे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुधगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर फिरण्यासाठी गेले होते. पाणी पिण्यासाठी  गावच्या हद्दीतील बोगद्याजवळ उतरले. यावेळी पाय घसरून दोघे कालव्यात बुडाले. ग्रामस्थांनी काल सायंकाळी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिंदे यांचा मध्यरात्री मृलतदेह सापडला तर आज रविवारी दहाच्या सुमारास भोसले यांचा मृतदेह सापडला. मृतदेहावर  सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

भोसले यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे तर विठ्ठल शिंदे हे अंध होते त्यांच्यामागे दोन भाऊ, आई असा परिवार आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ए. के. कांबळे करत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT