Kalammawadi Dam News 
कोल्हापूर

Kalammawadi Dam : मित्राला वाचवण्यासाठी डोहात उडी मारली, पण...; काळम्मावाडी धरणात बुडून निपाणीतील दोघांचा मृत्यू

Kalammawadi Dam Latest News : अद्याप दोघांने मृत देह सापडले नसून शोध कार्य चालू आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

राजेंद्र हजारे

निपाणी, ता.१: येथील आंदोलन नगरातील बारावीमधील वर्गमित्र काळम्मावाडी, (ता. राधानगरी) येथे पर्यटन करून धरण पाहण्यासाठी गेले होते. पण पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता.१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश चंद्रकांत कदम (वय १८ ) आणि प्रतीक पाटील ( वय २२ दोघेही रा. आंदोलननगर निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे आंदोलननगर परिसरात शोककळा पसरली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांच्याही मृतदेहांचा शोध सुरू होता.

गणेश कदम या युवकला पोहता येत नव्हते. तरीही काळम्मावाडी धरणासमोरील दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. त्याची कल्पना आल्यानंतर मोटर चालक प्रतीक पाटील याने कदमला वाचविण्यासाठी डोहात उडी मारली. पण पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, पोलीस भैरवनाथ पाटील, रघुनाथ पोवार दाखल झाले आहेत. जयसिंग किरुळकर, धोंडीराम राणे हे नदी पात्रात उतरून शोध कार्य चालविले आहे. राधानगरी परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. त्यामुळे शोधकार्य पथकाला अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघांने मृत देह सापडले नसून शोध कार्य चालू आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT