Two groups clashed with swords iron pipes and grenades 
कोल्हापूर

शेकोटीच्या वादातून हाणामारी; आठ जण जखमी

सकाळ वृत्तसेवा

बोरपाडळे (कोल्हापूर) : माले (ता. पन्हाळा) येथे रस्त्यात शेकोटी पेटवल्याच्या आणि पूर्वीच्या रस्त्याच्या वादावरून सोमवारी रात्री दोन गटात तलवारीसह लोखंडी पाईपसह आणि गजाच्या वापराने झालेल्या तुंबळ हाणामारीत आठ जण जखमी झाले. यातील तिघे गंभीर आहेत. ८ जणांवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.


कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,

मालेतील बिरोबा मंदिराजवळील सरकारी दवाखान्याजवळच्या दोन परिवारात पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती. गावस्तरावर वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला; परंतु सोमवारी रात्री या परिवारामध्ये रस्त्यात शेकोटी केल्याने व रस्त्यात गाडी अडवल्याने वाद उफाळून आला.


गणपती बाबू बादरे व विकास तुकाराम वगरे यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या. जखमींवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT