two home guard arrested because tekken bribe in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर ; लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोन होमगार्डवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - होमगार्ड म्हणून तीन वर्षे उत्कृष्ठ सेवा सर्टीफिकेट मिळवून देण्यासाठी अडीच हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघा होमगार्डवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. अनिकेत संताजी सरनाईक (वय 23, रा. शाहू कॉलनी, मंगळवार पेठ) आणि निलेश विठ्ठल सुतार (वय 26, रा. टेंबलाईवाडी) अशी त्या संशयिताची नावे असल्याचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. 

होमगार्डमध्ये तीन वर्षे उत्कृष्ठ सेवा सर्टीफिकेट हे पुर्ननियुक्तीला आवश्‍यक असते. त्याचबरोबर पोलिस भरतीमध्ये हे प्रमाणपत्र मिळालेल्या होमगार्डना विशेष कोटा देण्यात येतो. तक्रारदार हे होमगार्ड आहेत. त्यांना तीन वर्षे उत्कृष्ठ सेवा सर्टीफिकेट व पुर्ननियुक्तीसाठीचा फॉर्म भरून कागदपत्रे सादर करण्यास कार्यालयाने कळवले होते. त्याबाबत तक्रारदारांनी कार्यालयात अर्ज सादर केला होता. दरम्यान जुना राजवाडा येथील होमगार्ड कार्यालयात काम करणारे होमगार्ड संशयित अनिकेत सरनाईक व निलेश सुतार या दोघांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्या दोघांनी त्यांना तीन वर्षे उत्कृष्ठ सेवा प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली.


 याबाबत तक्रारदारांनी 17 जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. त्याच दिवशी विभागाने तक्रारीची पडताळणी करून खात्री केली. यानंतर विभागाने सापळा रचला. पण संशयित सुतारने तक्रारदारांना सोमवारी (ता.20) जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे भेटण्यास बोलवले. त्या दिवशीही विभागाने सापळा रचला. पण त्या दिवशीही सरनाईक व सुतार या दोघांनी तक्रारदारांकडून पैसे घेतली नाहीत. पण त्या दोघांनी लाचेची मागणी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, कर्मचारी मनोज खोत, विकास माने, नवनाथ कदम, मयुर देसाई यांनी केली. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT