Two hundred patients in contact with corona positive doctor in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर ; चंदगड तालुका हादरला ; त्या डॉक्‍टरच्या संपर्कात तब्बल दोनशे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

चंदगड (कोल्हापूर) - शिनोळी (ता. चंदगड) येथे एका डॉक्‍टरला कोरोनाची लागण झाली असून, त्याच्या संपर्कात सुमारे २०० रुग्ण होते. त्याशिवाय हलकर्णी (ता. चंदगड) येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो ज्या तीन डॉक्‍टरांच्या संपर्कात होता, त्यांचा संपर्क इतर रुग्णांशी आला आहे. संपर्काची मोठी साखळी विचारात घेता प्रशासन हादरले. समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिनोळी येथील डॉक्‍टरचे परिसरासह सीमाभागातील अनेक गावांत रुग्ण आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना घशात दुखू लागले. तिसऱ्या दिवशी श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून त्यांनी बेळगाव येथे जाऊन कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते त्याच दिवशी सिव्हील रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या रुग्णांची संख्या मोठी असून, त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. हलकर्णी येथे सापडलेला रुग्ण ५४ वर्षीय असून, काही दिवसांपूर्वी त्याला खोकल्याचा त्रास सुरू झाला. स्थानिक दोन डॉक्‍टरांकडे तपासणी करूनही बरे वाटत नसल्याने बेळगाव येथील खासगी डॉक्‍टरकडे तपासणी करून घेतली; परंतु त्रास वाढल्यामुळे तो येथील ग्रामीण रुग्णालयात आला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. साने यांनी त्याची लक्षणे विचारात घेऊन सीपीआर रुग्णालयात रवाना केले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हलकर्णी गावातील ग्रामस्थांना धक्का बसला आहे. स्थानिकांशी थेट संपर्क आणि ज्या स्थानिक डॉक्‍टरांकडे त्याने उपचार घेतले होते, त्यांच्या संपर्कातील रुग्णांची संख्या सुध्दा मोठी आहे. यामुळे समूह संसर्गाचा धोका असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी. गरज असेल तरच घराबाहेर पडावे; अन्यथा घरात राहून स्वतःला व इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चंदगड बाजारपेठेच्या सीमा ‘सील’
 दरम्यान, शहरातील मुख्य बाजारपेठेत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या गल्लींच्या चारही सीमा बंद करण्याचा आदेश प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिला. त्यानुसार आज हे रस्ते बंद केले आहेत. 

अडकूर येथील एकाचा येथील बाजारपेठेत सोनाराचा व्यवसाय आहे. तो कोरोनाबाधित आढळला. त्याच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. व्यवसायामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आला आहे. 

शेजारील लहान मुलगी या दुकानात सतत ये-जा करत असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. त्याच्या अतिसंपर्कात असलेल्या व्यक्तींचा रामदेव गल्ली व शिवाजी गल्लीमध्ये वावर होता. त्यामुळे या तिन्ही गल्लींच्या सीमा बंद केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात पुढील आदेश होईपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापना, दुकाने व व्यवसाय पूर्णतः बंद राहणार आहेत. दूध, भाजीपाला, किराणा माल, औषधे, खते, बी-बियाणे आदी सेवा घरपोच देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT