Two infected in the district, 664 corona free 
कोल्हापूर

जिल्ह्यात दोघांना लागण, 664 जण कोरोनामुक्त 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात आज दिवसभरात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. तरएकूण 13 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 728 झाली असून यातील 664 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एकूण 56 कोरोनाबाधित व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यातील सहाहून अधिक शासकीय रूग्णालयात बाहेरगावावरून आलेल्या व्यक्ती आजही तपासणीसाठी आल्या. त्या पैकी 126 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचे अहवाल उद्या येणार आहेत. तर मंगळवारी घेण्यात आलेल्या 60 स्वॅबचे अहवाल आज दिवसभरात प्राप्त झाले. यातील हातकंणगले व राधानगरी या दोन तालुक्‍यातील प्रत्येकी एक व्यक्ती कोरोनापॉझिटिव्ह आले आहे. उर्वरीत सर्व स्वॅब निगेटिव्ह आले. 

बाहेरगावारून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली, स्वॅब घेतला की, त्यांना व्कारंटाईन करण्यात येते. मात्र बाहेर गावावरून येणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने दिवसभरात फार तर दोनशे ते अडीचशे व्यक्ती येत आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यात ज्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर आयजीएम रूग्णालयात, गडहिंग्लज व शाहूवाडी पेरीड येथील शासकीय आरोग्य केंद्रातही उपचार होत आहेत. वरील एकूण कोरोनाग्रस्तांत 98 टक्के व्यक्ती बाहेरगावावरून येथे आल्या आहेत. त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह येताच त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यामुळे सामाजिकस्तरावर कोरोनाचा फैलाव वेळीच रोखला गेला आहे. अशी माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. 

तालुकानिहाय रूग्ण 
आजरा 76, भुदरगड 71, चंदगड 75, गडहिंग्लज 84, गगनबावडा 6, हातकणंगले 11, कागल 57, करवीर 21, पन्हाळा 27, राधानगरी 67, शाहूवाडी 180, शिरोळ 7, इचलकरंजी 11, कोल्हापूर शहर 27, अन्य राज्यातील 8. 

एकूण--- 728 
एकूण कोरोनामुक्त----664 
मृत्यू ------------------8 
सध्या उपचार घेणारे 56 

दृष्टिक्षेप 
- जिल्हाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 728 
- कोरोनामुक्त झालेल्या व्यक्ती 664 
- तपासणीसाठी पाठवलेले स्वॅब 126 
- आज दिवसभरात प्राप्त झालेले स्वॅब अहवाल 60 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT