Two more arrested in Kalamba jail mobile case 
कोल्हापूर

कळंबा कारागृह मोबाईल प्रकरणी आणखी दोघांना अटक 

राजेश मोरे

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आज आणखी दोघांना संशयितांना अटक केली. मयूर राजेंद्र जाधव (रा. कोडोली, सातारा) आणि विकी ऊर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (रा. नरवणे, ता. माण, सातारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, काही महिन्यापूर्वी आलीशान मोटारीतून आलेल्या संशयितांनी कळंबा कारागृहात तीन पुडकी फेकली होती. त्यात 10 मोबाईल संच, पेन ड्राईव्ह, चार्जर मिळून आला होता. यानंतर कारागृहाची झडती घेण्यात आली होती. यात झाडाच्या बुंध्यात लपविलेला मोबाईल मिळून आला होता. मोबाईल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी गेल्या आठवड्यात संशयित शुक्रराज घाडगे, अभिमान माने व युवराज महाडिक या तिघांवर कारवाई केली होती. चौकशीत या मोबाईलचा संशयित मयूर जाधव व विकी ऊर्फ मन्या बनसोडे या दोघांनी वापर करून नातेवाईकांशी संपर्क साधल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार त्या दोघांवर आज कारवाई करण्यात आली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT