Two more corona free people in Belgaum district 
कोल्हापूर

बेळगाव जिल्ह्यात आणखी दोघे 'कोरोनामुक्त'

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - कोरोनावर मात करण्यात आलेल्या दोघांना आज (ता.7) डिस्चार्ज देण्यात आला. हिरेबागेवाडी, कुडची येथील प्रत्येकी एकला डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृतीत सुधारणा, अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे बीम्स प्रशासनातर्फे डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे घरी जाऊ दिलेल्या रुग्णांची संख्या 36 झाली.

जिल्ह्यात 74 जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी 34 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज दिला. त्यामध्ये आणखी दोघांची भर पडली. यामुळे बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या 36 झाली. डिस्चार्जमध्ये एक हिरेबागेवाडी (पी-284) आणि एक रायबाग तालुका कुडची (पी-300) येथील आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने वरील दोन्ही रुग्णांचे अहवाल प्रयोगशाळेला पाठवले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एप्रिल महिन्यांमध्ये कोरोना कक्षात दाखल केले. वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर आणि अहवाल दोन वेळा निगेटिव्ह आल्यानंतर बीम्सचे वैद्यकीय अधीक्षक विनय दास्तीकोप्प यांनी वरील दोघांना कोरोनामुक्त जाहीर केले.
कोरोना संसर्गची टक्केवारी घटली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवार ते गुरुवार या दरम्यान एका विद्यार्थीनीला (रा. हिरेबागेवाडी) कोरोनाची लागण झाली आहे. एकूण अठरा जणांना या कालावधीत डिस्चार्ज दिला. त्यामुळे आठवड्यात वीस जणांना घरी सोडले आहे. कोरोना कक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या 37 झाली आहे.

आकडे बोलतात

  • एकूण रुग्ण - 74
  • एकूण डिस्चार्ज - 36
  • आज डिस्चार्ज - 2
  • मृत्यू - 1
  • कोरोना कक्षात उपचार - 37
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT