two more corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - लाॅकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता आणल्यामुळे हळूहळू पूर्वपदावर येत असलेल्या कोल्हापुरात आज आणखीन तिघे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  सीपीआर रुग्णालयात दाखल असलेल्या दोन युवकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यांना कोरोना उपचार कक्षात तातडीने दाखल करण्यात आले आहे. यातील तेवीस वर्षीय युवक केरले (ता. शाहुवाडी) येथील आहे. तर दुसरा वीस वर्षीय युवकही माणगाव तालुका शाहूवाडी येथील असून तिसरा रूग्ण पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील  आहे. तो मुंबई येथून आला आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केरले येथील युवक गेल्या तीन दिवसापूर्वी सीपीआर रुग्णालयात प्रकृती बरी नसल्याने दाखल झाला होता. त्याचा कोरोना तपासणी वेळी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज दुपारी प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव आहे. यातील एक युवक मुंबईतून प्रवास करून आलेला आहे. त्याची तपासणी केली असता त्याचा स्वॅब कोरोना पॉझिटिव आला.  


शाहूवाडी तालुक्यातील हा सातवा कोरोना रुग्ण आहे. यापूर्वी पाच जण कोरोना ग्रस्त होते. ते पाचही कोरोना मुक्त होऊन गावी परतले आहेत. त्यापाठोपाठ आज युवक कोरोना बाधित आढळल्याने शाहूवाडी तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.

हे पण वाचा -  अन् त्याने अंगावरील कपडे काढून थेट कूपनलिकेतच घेतली उडी... 

सीपीआर रुग्णालयात सध्या 9 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज नव्याने कोरोनाग्रस्त म्हणून दाखल झालेल्या युवकांची प्रकृती स्थिर आहे. जुन्या पाच जणांच्या प्रकृतीत सुधारणा आहे तर जुन्या दोन कोरोनबाधितांची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT