two new patients of corona is found in kuduchi the seal down will increase again 
कोल्हापूर

'या' कारणाने वाढणार कुडचीत सील डाऊन !

एम. ए. रोहिले

रायबाग (बेळगाव) - चार दिवसापासून तालुक्यातील कुडची येथे एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र शुक्रवारी (ता. २४) दुपारी दोन मुलांना बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले. मुलगा व मुलगी असे दोन  नवीन रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंता व भीती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील सील डाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार आहे. आज (ता. २४) देखील येथील बंदोबस्त कायम होता.

एक कोरोना बाधित महिला रोगमुक्त होऊन कुडची येथील आपल्या घरी परतली आहे. तसेच वैद्यकीय अहवालातून गेल्या चार दिवसात एकही बाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवारी  (ता. २४) दुपारी पंधरा वर्षाचा मुलगा व दहा वर्षाच्या मुलीला कोरोना झाल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले. या आधी बाधित झालेल्या रुग्णांच्या कुटुंबातीलच ही दोन मुले आहेत. नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन, पोलिस, वैद्यकीय खात्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले आहेत. कुडची हे हॉटस्पॉट असल्याने मोबाइल क्लिनिक सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्याची चांगली मदत शहरवासीयांना होणार आहे.

शनिवार (ता. २५) पासून रमजान महिन्याला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कुडची पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी शहरातील मस्जिदींच्या इमामाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान काळात मुस्लिम बांधवांनी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. केवळ तिघांना नमाज पठणाची मुभा देण्यात आली आहे. सामूहिक नमाज पठणाला परवानगी मिळालेली नाही. तसेच ध्वनिक्षेपकावरून अजान देखील करावयाची नाही, अशी सूचना करण्यात आली आहे.

नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन

कुडची येथे रुग्णसंख्या न वाढण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी स्वतः आरोग्य खात्याशी संपर्क साधून तपासणी करून घेण्याचे आवाहन कुडची नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन व कुडची समुदाय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कलट्टी यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT