Two officers arrested for taking bribe to issue fisheries license 
कोल्हापूर

मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी लाच घेताना दोन अधिकारी जाळ्यात 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - पाझर तलावामध्ये मत्स्यव्यवसाय परवाना देण्यासाठी ताराबाई पार्कातील वारणानगर येथील मृदू व जलसंधारण विभागातील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांना 18 हजाराची लाच घेताना आज अटक केली. जलसंधारण अधिकारी (वर्ग-2) शिवाजी हणमंत नेसरकर (रा.प्लॉट नं.15, निवारा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि कार्यकारी अभियंता (वर्ग-1) यशवंत लक्ष्मण थोरात (वय 55, दोघे सध्या रा.वारणा बंगला, सिंचन भवन जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ रा. डी 2, गणेश गार्डन, बिबवेवाडी, पुणे 37) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज ही कारवाई केली. 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की तक्रारदार हे मत्स्य व्यवसायिक आहेत. त्यांना पाझर तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी पाझर तलावाची आवश्‍यकता होती. हे तलाव जलसंधारण विभागाकडे येत असल्यामुळे त्यांनी ते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कार्यकारी अभियंता यशवंत थोरात याला वीस हजार रुपये द्यावे लागतील, असे जलसंधारण अधिकारी शिवाजी नेसरकर याने सांगितले. हे शक्‍य नसल्यामुळे तक्रारदाराने नकार दिला. तेंव्हा तडजोडीने 18 हजार रुपये द्यावे, अशी मागणी केली. ही मागणी आज त्यांच्या कार्यालयात पूर्ण करण्यासाठी तक्रारदार गेले होते. तेथे दोघांनीही रंगेहात पकडले. 

सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार संजीव बंबर्गेकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलिस नाईक विकास माने, कॉस्टेबल मयूर देसाई व रुपेश माने यांचा सहभाग होता. 

नुकताच मत्स्य विभागातील सहाय्यक आयुकतांला महापुरातील नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणी अटक केलेली घटना ताजी असताना आज ही घटना घटली. थेट वर्ग एक आणि दोनच्या दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्यामुळे लाच स्वीकारणाऱ्यांत आता अधिकारीच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. महिन्यापूर्वीच राजारामपुरी पोलिस ठाण्यातील डी.बी. शाखेतील प्रमुखालाच लाच घेताना अटक झाल्याची घटना आजही चर्चेत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

SCROLL FOR NEXT