two thief arrested in kolhapur 
कोल्हापूर

लग्नावरून परतल्यानंतर घराचे दार उघडून पाहिले तर...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून दागिने, रोख रक्कम, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू असा सुमारे 64 हजाराचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना आज अटक झाली. राजारामपूरी चौथ्या गल्लीमधील सिद्धकला अर्पाटमेंट इथे त्यांनी 29 जून रोजी चोरी केल्याचे तपासात उघड झाले. बलीराम उमेश चौधरी (वय 26) आणि शिवपाल बिनदा प्रसाद चौधकी (वय 20, दोघे रा.आईचा पुतळा, भाजी मंडई जवळ) अशी त्यांनी नावे आहेत. राजारामपूरी पोलिसांनी ही कारवाई केली. 

या कारवाई बाबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्‍विनी सचीन खोत (वय 36, रा. सिद्धकला अपार्टमेंट, राजारामपूरी 4 थी गल्ली) यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. 29 जून रोजी त्या वाठार येथे एका लग्नासाठी गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना घराचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला. तसेच घरातील दागिने, वस्तू नसल्याचे आढळले. यामध्ये 20 हजार रुपये सोन्याच्या दोन आंगठ्या, 10 हजार रुपये किंमतीचा कानातील टॉप्स, 7 हजार रुपयांची इमिटेशन ज्वेलरी, 6 हजार रुपये किंमतीची रिंग लाईट, 4 हजार रुपयांची साउंड सिस्टिम, 2 हजार रुपये किंमतीच्या हॅंड्‌ज बॅग, पाचशे रुपये किंमतीचा हेअर ड्रायर, एक हजार रुपये किंतीचा हेडफोन व 12 हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल होता. याबाबतची तरक्रार त्यांनी पोलिसांनी दिली.

याचा तपास करताना पोलिसांनी बलीराम आणि शिवपाल यांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमालाबाबतची चौकशी सुरू असून अद्याप मुद्देमाल हस्तगत झालेला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठा-ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'हैद्राबाद गॅझेटचा शब्दनशब्द मी..', सरकारच्या निर्णयावरही केली टीका

Ujani Dam Update : उजनीतून भीमा नदी पात्रात १ लाखाहून अधिक क्युसेक्सने विसर्ग; भीमा नदीला पूर स्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ladki Bahin Yojana: तब्बल ४ लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारला लावला चुना, पडताळणीत धक्कादायक बाब उघड; नेमकं काय घडलं ?

Latest Marathi News Updates : सोलापूरमध्ये पावसाची मुसळधार! पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

SCROLL FOR NEXT