Two thieves arrested in kolhapur 
कोल्हापूर

दोन अट्टल घरफोड्यांना अटक ; 21 तोळे दागिन्यांसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त  

राजेश मोरे

कोल्हापूर - दोघा अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्या दोघांकडून हातकणंगले तालुक्‍यातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याकडून 21 तोळ्याहून अधिकचे सोन्याचे, 608 ग्रॅम चांदीचे दागिन्यासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हर्षवर्धन सुरेश पाटील (वय 24) व तेजस तानाजी पाटील (वय 22, दोघे रा. नेज शिवपुरी, ता. हातकणंगले) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, घरफोडीचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना नेज, शिवपुरी (ता. हातकणंगले) येथील संशयित हर्षवर्धन पाटील व तेजस पाटील या दोघांनी बाहुबली (ता. हातकणंगले) येथे घरफोडी केली आहे. ते गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने विकण्यासाठी इचलकरंजी फाटा मार्गे इचलकरंजीला मोटारसायकल मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने येथे 8 ऑक्‍टोबरला सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडून दागिने मिळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्या दोघांनी 11 महिन्यापूर्वी बाहुबली (ता. हातकणंगले) येथे रात्रीच्या वेळी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघांना पोलिसांनी अटक केली.

चौकशीत त्या दोघांनी आळते (ता. हातकणंगले) येथील बोअरवेल मधील मोटारपंप अशा दोन चोरीची कबुली दिली. ही कारवाई निरीक्षक सावंत, सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, संतोष पवार कर्मचारी चंद्रकांत ननवरे, संजयपडवळ, सोमराज पाटील, रणजित पाटील, रवींद्र कांबळे, संतोष पाटील, नामदेव यादव, रणजित कांबळे, रफिक आवळकर, अनिल जाधव यांनी केली. 

चोरलेले दागिने ठेवले होते तारण... 
संशयित हर्षवर्धन व तेजस पाटील या दोघा संशयितांकडून चोरीतील सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, नेकलेस, चेन, अंगठी, कानवेल, रिंगा, टॉप्स्‌, लहान मुलांचे दागिने असे साडे एकवीस तोळ्याचे सोन्याचे दागिन्यासह चांदीचा कलश, नारळ, पाने, कमरपट्टा असे 608 ग्रॅमचे चांदीचे दागिने, दोन मोबाईल संच, मोटा पंप, केबल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 12 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. लॉकडाऊनमुळे 11 महिन्यापूर्वी चोरलेला दागिन्यापैकी काही दागिने बॅंकेत तारण ठेवले होते. त्यातून साडेपाच लाखांचे कर्ज घेतले होते. इतर दागिने स्वतः जवळ ठेवले होते. त्यामुळे ते जशाच्या तसे जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT