Two thousand patients were cured at home; Pictures in rural areas including cities 
कोल्हापूर

दोन हजार रुग्ण घरीच झाले बरे ; शहरासह ग्रामीणमधील चित्र

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून घाबरण्याचे कारण नाही, घरी राहूनच आपण कोरोनावर मात करू शकतो. योग्य उपचार, आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन यासाठी आवश्‍यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 414 रुग्ण घरी राहूनच बरे झाले आहेत. यात शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. 
कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यात कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हे रुग्ण घरीच उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊ शकतात. शासनाने याबाबत आदेश काढून घरी उपचार घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी रुग्णाच्या घरी त्याची राहण्याची व स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था आवश्‍यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे पत्र आवश्‍यक आहे. घरात स्वतंत्र राहून योग्य ते उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो. उपचार सुरू झाल्यानंतर पाच दिवसांनी लक्षणे नसतील, तर अन्य औषधे बंद करून व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि डी, झिंक या गोळ्या सुरू ठेवल्या जातात. हे रुग्णाच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून आहे. 
10 दिवसांच्या नंतर लक्षणे नसतील, तर तो घरातच कुटुंबाशी संपर्क ठेवू शकतो. त्यानंतर सात दिवसांनी घराबाहेर पडू शकतो. 


ही खबरदारी आवश्‍यक 
*घरात रुग्णाची व्यवस्था स्वतंत्र असावी, कुटुंबीयांशी संपर्क नको 
* कुटुंबातील सुदृढ व्यक्तीने रुग्णाची काळजी घ्यावी 
*रुग्णाचे स्वच्छतागृह स्वतंत्र असावे, त्याचे निर्जंतुकीकरण रोज करावे. 
* हाय प्रोटिनयुक्त आहार वेळच्यावेळी घ्यावा (पालेभाज्या, फळे आवश्‍यक) 
* रोज 4 ते 5 लिटर पाणी प्यावे. 
* औषधे वेळच्यावेळी घ्यावीत, झोप, विश्रांती आवश्‍यक 
* सकारात्मक मानसिकता राहील, असे वाचन करावे. 
* रोज प्राणायाम, अनुलोमविलोम, ध्यान अत्यावश्‍यक. 
* दिवसातून दोन वेळा थर्मामीटरने तापमान आणि ऑक्‍सिमीटरने ऑक्‍सिजनचे प्रमाण पाहावे. 

कोरोनाबाधित रुग्णाला समाजाने आणि कुटुंबाने स्वीकारले पाहिजे. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होऊ शकतात. घरी राहिल्याने रुग्णाला मानसिक आधार मिळतो. त्याची मानसिकता सकारात्मक राहते. जेवण, औषधे वेळच्यावेळी मिळतात. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात. योग्य खबरदारी व उपचार घेऊन घरीच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसागणिक वाढत आहे. 
- डॉ. फारूक देसाई, जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT