Two thousand ीे funds were announced to the construction workers 
कोल्हापूर

बांधकाम कामगारांना दोन हजाराचा निधी जाहीर केला पण...

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - राज्य शासनाकडून बांधकाम कामगारांना दोन हजाराचा निधी जाहीर केला गेला . मात्र याबाबत बांधकाम कामगारांतून समिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्याच्या स्थीतीत हा निधी अपुरा असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असतांना दुसरीकडे गरजेच्यावेळी हा निधी देण्याच्या निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनमुळे उद्योग क्षेत्र बंद आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कामगारांसमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ आहे. या मंडळाकडे सध्या 9 हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांना किमान 15 हजार रुपये देण्याची मागणी संघटनांनी केली होती. तर कामगार विभागांने 5 हजार देण्याची शिफारस केली होती.

या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून किती निधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात दोन हजार रुपये निधी देण्याची घोषणा जाहीर झाल्यानंतर बांधकाम कामगार संघटनांनी समिश्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. कांहीनी नाराजी व्यक्त केली. तर कांहीजणांनी या निर्णयाचे स्वागत केले. केवळ नोंदीत बांधकाम कामगारांना ही रक्कम मिळणार आहे. राज्यात 12 लाख 38 हजार नोंदीत कामगार आहेत. तर बांधकाम क्षेत्रातील उद्योगातील संबंधित अनोंदीत कामगार सुमारे 68 लाख इतके आहेत. त्यांना मात्र या निधीपासून वंचित रहावे लागणार आहे.

इचलकरंजी परिसरात 2 कोटी 90 लाख मिळणार

शासनाच्या या निर्णयाचा इचलकरंजी परिसरातील सुमारे 14500 बांधकाम कामगारांना 2 कोटी 90 लाख इतका निधी मिळणार आहे. हा निधी लवकरच त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदीत कामगारांना ही रक्कम मिळणार आहे.
 

“लालबावटा बांधकाम कामगार संघटनेने 15 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. पण या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.“
भरमा कांबळे - कार्याध्यक्ष - महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती

“शासनाने जाहीर केलेला निधी तुटपुंजा आहे. तरीही अडचणीच्या काळात मदत केल्याबद्दल शासनाच्य निर्णयाचे स्वागत करीत आहोत.“
आनंदा गुरव - महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

Corporation Water Crasis : कोल्हापुरात पाणीपुरवठ्यावरून वाद; महापालिका-जलसंपदा आमनेसामने, पदाधिकाऱ्यांची कडक भूमिका

Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! निधी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु, कारण काय?

Financial Planning: 50,000 पगारातही बचत नाही? 15 दिवसांत पैसे संपतात? तज्ञांनी सांगितलेले हे 5 नियम वापरा आणि पैशांची टेन्शन संपवा

SCROLL FOR NEXT