Two Villages In Chandgad Taluka Became Hot spots Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगड तालुक्‍यातील 'ही' दोन गावे बनलीत हॉट स्पॉट, रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 

सुनील कोंडुसकर

चंदगड : तालुक्‍यातील तांबुळवाडी व शिनोळी खुर्द ही गावे कोरोनासाठी हॉट स्पॉट बनली आहेत. तालुक्‍यातील रुग्ण संख्या 181 झाली आहे. यापैकी निम्याहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक ठरत आहे. मोठ्या गावांसह तालुक्‍यातील दुर्गम वाडी-वस्तीवर रुग्ण सापडत असल्याने चिंता वाढली आहे. 

तांबुळवाडी येथे आता 29 रुग्ण सापडले असून गावातील एकूण रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ शिनोळी खुर्द येथे 16 रुग्ण सापडले आहेत. अडकूर येथे 17 रुग्ण सापडले होते. उपचारानंतर ते सर्वजण बरे झाले आहेत. त्यांच्या संपर्कातील सुमारे 300 नागरिक, तर मुगळी येथील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 60 नागरिकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने या परिसराला दिलासा मिळाला आहे. मात्र इतर गावात नव्याने सापडणारे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांची संख्या विचारात घेता समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

अलीकडच्या काळात सापडलेले हे सर्व रुग्ण स्थानिक आहेत. दौलत कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाधितांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. या कारखान्यात सुरवातीला सिव्हिल विभाग आणि त्यापाठोपाठ बॉयलर विभागात रुग्ण आढळले. कारखान्यात मोठ्या संख्येने कामगार हजर राहिल्यामुळे संपर्कातून त्याचा फैलाव झाल्याची शक्‍यता आहे.

कारखान्यावर तालुक्‍यातील बहुतांश गावातील कर्मचारी आहेत. त्यामुळे खबरदारी महत्त्वाची आहे. प्रशासनाने आठ दिवस कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही तो सुरू करताना सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन आवश्‍यक आहे. 

स्वॅब अहवाल घेणे आवश्‍यक 
एका गावातील काजू कारखान्यात मजुरीला जाणारी महिला पॉझिटिव्ह आली आहे. ती ज्या विभागात काम करत होती तिथे विविध गावांतील 90 महिला कार्यरत होत्या. दिवसभर जवळून संपर्क आल्यामुळे या महिलांना क्वारंटाईन करून त्यांचा स्वॅब अहवाल घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा संसर्गाची साखळी जलद गतीने वाढण्याचा धोका आहे. वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. गरज असेल तरच बाहेर पडावे. गर्दी करू नये. शेतीची कामे करतानासुद्धा योग्य ती खबरदारी घ्यावी.

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

Virar News : धर्म स्वातंत्र्य कायद्याला कॅथलिक बिशप्सचा विरोध; संविधानिक अधिकारांवर गदा असल्याचा आरोप

Solapur politics: सोलापुरातील सिद्धेश्वर देवस्थानच्या भूमिकेने कोठे गट तोंडघशी; लिंगायत स्मशानभूमी प्रकरणातील राजकारण भाजपच्या अंगलट!

SCROLL FOR NEXT