Two-wheelers are prohibited from cycling to maintain social distance during the period of curfew
Two-wheelers are prohibited from cycling to maintain social distance during the period of curfew  
कोल्हापूर

दुचाकीवरुन दोघांना बंदी तरी चारचाकीमधून दोघांनाच करता येणार प्रवास...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - संचारबंदीच्या कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठी दुचाकीवरुन दोघांना फिरण्यास बंदी आहे. चारचाकीमधूनही चालवणारी एक व्यक्ती आणि पाठीमागे एक अशा दोघांनीच प्रवास करावा. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.

राज्य शासनाने उद्यापासून उद्योगधंदे, व्यवसाय तसेच कार्यालये काही प्रमाणात सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन स्वतंत्रपणे निर्णय घेत आहे. कोणत्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यायची, किती कामगारांची, किती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना परवानगी द्यायची याबाबत आज सायंकाळपर्यंत सविस्तर धोरण जाहीर करण्यात येईल.

मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयामधील काही कर्मचारी आप आपल्या गावामध्ये आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या मूळ कार्यालयात हजर व्हायचे असेल तर त्याची परवानगीही संबंधित तहसिलदार कार्यालयाकडून मिळेल. संचारबंदीमध्ये अत्यावश्यक तसेच जीवनावश्यक बाबींसाठी नजिकच्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकीमधील प्रवासाला सूट देण्यात आली आहे. परंतु असे निदर्शनास येत आहे, दुचाकीवर चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे. अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्यक्ती अशा दोनच व्यक्ती बसून चारचाकी वापरु शकतात. याचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना देण्यात आले आहेत.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT