Two Years Have Passed Without A Statue Of Dr. J. P. Naik Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

डॉ. जे. पी. नाईक यांच्या पुतळ्याविना उलटली दोन वर्षे 

अशोक तोरस्कर

उत्तूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी बहिरेवाडीत (ता. आजरा) तीन कोटी पाच लाख रुपये खर्च करून भव्य स्मारक उभारले. 23 एप्रिल 2018 रोजी या स्मारकाचे उद्‌घाटन झाले. मात्र अद्याप या ठिकाणी डॉ. नाईक यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. या ठिकाणी पुतळा उभा करावा, अशी मागणी शिक्षणप्रेमींतून होत आहे. दरम्यान, स्मारकाअंतर्गत शाळेची सुधारणा, गावतलाव सुशोभीकरण, जीवनपट दाखवणारी ध्वनी प्रकाश योजना तयार करणे ही कामे अद्याप प्रलंबित आहेत. 

डॉ. जे. पी. नाईक यांच्या जन्मगावी स्मारक व्हावे, ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती. या स्मारकाला दहा वर्षांपूर्वी शासनाने हिरवा कंदील दाखवला. ग्रामपंचायतीच्या मालकीची चौदा गुंठे जमीन आहे. या ठिकाणी स्मारक साकारण्यासाठी वाईच्या संदीप गुरव यांनी आराखडा तयार केला. 
तीन कोटी पाच लाख रुपये खर्च करून स्मारक उभे राहिले. यामध्ये बहूउद्देशीय सभागृहाचा तळमजला व पहिला मजला बांधला. यासाठी दोन हजार चौरस फुटाचे बांधकाम झाले. जागेच्या व स्मारकाच्या सभोवती नक्षीदार दगडांची भिंत बांधून लोखंडी दरवाजे उभारले. पाणीपुरवठा, विद्युतीकरण, फर्निचर, सभोवतालचे रस्ते, भिंती शिल्पे उभारण्यात आली.

अद्याप या स्मारकासाठी दोन कोटीहून अधिक निधीची गरज आहे. डॉ. जे. पी. नाईक यांच्या मुळ निवासस्थान जतन करून त्याठिकाणी वाचनालय व अभ्यासिका तयार करणे, त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेची सुधारणा करणे, गावतलाव सुशोभित करणे, जीवनपट दाखवणारी ध्वनी प्रकाश योजना तयार करणे ही कामे प्रलंबित आहेत. 

मेळ बसत नाही
गेली दोन वर्षे ग्रामपंचायत या स्मारकाची देखभाल व वीज बिल भरते. स्मारकाच्या देखभालीसाठी होणारा खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नाही. 
- अनिल चव्हाण, सरपंच, बहिरेवाडी 

अर्थसंकल्पात घोषणा 
कै. बाबासाहेब कुपेकर यांनी विधानसभा अध्यक्ष असताना यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन वित्त मंत्र्यांनी स्मारक उभा करण्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली. 

मंत्री मुश्रीफ याचे प्रयत्न 
2010 मध्ये डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटी 71 लाख 25 हजार रुपये खर्चाचा अंदाजीत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला. 2013-14 रोजी नवीन प्रस्तावास शासनाने मंजूर दिली. या सर्व कामासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी विशेष प्रयत्न केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारताने विजयानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास का दिला नकार? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्ट शब्दात सांगितलं

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT