uday samant kolhapur tour declare swaraj din for shivjayanti start in kolhapur
uday samant kolhapur tour declare swaraj din for shivjayanti start in kolhapur 
कोल्हापूर

शिवछत्रपतींची जयंती आता 'स्वराज दिन' म्हणून साजरी होणार : उदय सामंत

संदीप खांडेकर

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विद्यार्थी व कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याअनुषंगाने निर्णय घेण्याचे राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. राज्याला व देशाला दिशा देणाऱ्या शिवछत्रपतींची जयंती 'स्वराज दिन,' म्हणून महाविद्यालयांत साजरी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सामंत म्हणाले, 'पंधरा दिवसांपूर्वी सर्व कुलगुरूंसोबत बैठक घेऊन महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहून विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्या संदर्भात आवश्यक निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार विद्यार्थ्यांसमोर राहावा, या उद्देशाने महाविद्यालयांत 'स्वराज्य दिन' साजरा केला जाणार असून, त्याबाबतचे परिपत्रक येत्या आठ दिवसांत प्रसिद्ध केले जाणार आहे.'

ते म्हणाले, 'कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ महाराष्ट्रात नाही. तो दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश येथेही वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी महाविकास आघाडी सरकार उपाय योजना करत आहे. या परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अधिवेशन होऊ नये, म्हणून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा आरोप करत असतील तर या विषयावर काय बोलावे? गुजरातमध्येही अधिवेशन आहे. ते होऊ नये, म्हणून कोरोनाचा संसर्ग वाढतोय का?'

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT