uddhav Thackeray deepak Kesarkar maharashtra politics  esakal
कोल्हापूर

Kolhapur News : ठाकरेंनीच जायला सांगितले; केसरकर यांचा दावा; ‘मविआ’तून बाहेर पडण्याचे आवाहन

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामांना सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. ठाकरे यांनीच आम्हाला जायला सांगितले. एवढेच नव्हे तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठाकरे यांनी काँग्रेस-''राष्ट्रवादी’कडून आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली होती, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी केले. दोन्ही काँग्रेसशी असणारी युती ठाकरे यांनी तोडावी.

आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे, असेही ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामांना सुरुवात केली आहे. याची पाहणी करण्यासाठी केसरकर आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘कोणत्याही पक्षाची सभा ही विराटच होत असते. तशीच उद्धव ठाकरे यांचीही झाली. दरवेळी आम्ही खोके घेतले म्हणून माजी मंत्री आदित्य ठाकरेंकडून टीका केली जाते. मात्र खोक्यांसोबत खेळण्याची सवय आदित्य यांना लहानपणापासूनच आहे, अशी टीका केसरकर त्यांनी केली.

मंत्री केसरकर म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला म्हणून त्यांनी आमदार केले आहे. विकत जायचे असते, तर अडीच वर्षांत केव्हीही आम्ही गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवले नाही. त्यांनीच आम्हाला निघून जायला सांगितले, ही बाजू जनतेसमोर कधीतरी मांडली पाहिजे.’’

फसवणूक झाल्याची मोदींसमोर कबुली

‘‘दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली होती. हिंदुत्वाचा विचार सोडल्याबद्दल चूक झाल्याचे त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्या गेल्या ती चूक दुरूस्त करू असा शब्द दिला होता. मात्र तो शब्द मोडत त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर भूमिका बदलली. शब्द आम्ही मोडला नाही, तर तो उद्धव ठाकरे यांनी मोडला. आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, मात्र त्यांनी आम्हाला निघून जायला सांगितले. आता ते उलट सांगत आहेत,’’ असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: खामेनेई कुठे लपलेत हे कसं कळलं? अमेरिका आणि इस्रायलने नियोजित वेळेपूर्वी हल्ला का केला? आतली माहिती आली समोर!

IND vs WI: टर्निंग पॉईंट! द. आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलण्याची भारताला संधी; इंग्लंडला टाळायचे असेल तर समजून घ्या गणित

Crime: 'त्या' गोष्टीचा राग डोक्यात गेला; आधी वाद घातला, नंतर फावड्याने वार जीवानिशी संपवला, राजस्थानी तरुणासोबत सांगलीत काय घडलं?

Rangpanchami 2026: रंगपंचमीच्या दिवशी त्वचा खराब होण्याचं टेन्शन येतंय? मग आजच करा 'हे' स्किनकेअर रुटीन फॉलो

Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी सुरू; कलम १६३ लागू, गावांमध्ये तणाव, शेतकऱ्यांचा संवादाचा आग्रह!

SCROLL FOR NEXT