under the leadership of women Sarpanch in Kagal taluka is fighting against Corona  
कोल्हापूर

आम्ही 'या' गावच्या कारभारी अन् कोरोनाविरूध्द असा लढा देई...

रमजान कराडे

नानीबाई चिखली (बेळगाव) - स्त्रीया या भावनिक असतात. त्यांच्यात नेतृत्वक्षमता, निर्णयक्षमतांचा अभाव असतो. त्यामुळेच त्या राजकीय नेतृत्व करण्यास असमर्थ असतात. असा गैरसमज आपण अनेक वर्षांपासून पाहतो. मात्र त्यांना योग्य संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करतात. याचाच अनुभव कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करताना महिला सरपंच कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. कागल तालुक्यात 83 पैकी 49 ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून महिला कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गावगाडा यशस्वीपणे कोरोनाविरोधात लढत आहे. आणि यामुळेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलांनी आपले नेतृत्व अधोरेखित केले
       
ग्रामपातळीवर 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम करने हे प्रतिष्ठेचे समजले जाते. अशा ठिकाणी महिलांनी सरपंच म्हणून काम केले तर त्यांच्यासाठी नेतृत्व दाखविण्याची संधी मानली जाते. मात्र बहूतेक ठिकाणच्या महिला सरपंच नामधारीच असतात.त्यांच्या पदराआड त्यांचे पतीच गावगाडा हाकतात. असे असताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महिलांनी आपले नेतृत्व अधोरेखित केलेले दिसत आहे.
      
कोरोना साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील सर्वच राज्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी पुकारण्यात आली. राज्य तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्याबरोबर गावे, खेडी अधिक सतर्क झाली. अशावेळी अल्पशिक्षित तसेच उच्चशिक्षित असलेल्या महिला सरपंचांनी संभाव्य धोक्याची माहिती करून घेतली. त्यांनी पुढाकार घेत गावागावातून बैठका घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे राबविले.

सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात पुढाकार

गावच्या सीमांची नाकेबंदी करतानाच आधारकार्ड पाहूनच गावकऱ्यांना गावात प्रवेश दिला. परराज्यातून, जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची तात्काळ माहिती घेत आरोग्य विभाग, पोलिसांना कळवितानाच त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर कॉरन्टाइनचे शिक्के मारत घरातच थांबण्यास सांगिताना त्यांच्यावर लक्ष ठेवले. हाताशी असलेल्या कर्मचार्‍यांना सोबत घेताना त्यांच्यासोबत प्रत्यक्ष जात स्वच्छता मोहीम,औषध फवारणी, पाणीपुरवठा रेशनवरील धान्य पुरवठा, अत्यावश्यक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात पुढाकार घेतला.

वाचा - ती म्हणते, आधीच कोरोना मुळे संसाराची वाट लागलीय अन् त्यांना दारू कोठून मिळाली?
         
अशावेळी त्यांना अडचणी देखील आल्या. अनेकांचे टक्केटोमणे ऐकावे लागले.वादविवादाच्या प्रसंगाला देखील सामोरे जावे लागले. मात्र तरीसुद्धा डगमगून न जाता त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. यातील बहुतांशी महिला सरपंचांचा कार्यकाल संपण्यास अवघे कांही दिवसच आहेत. त्यांना पुन्हा संधी मिळेल काय याचा देखील विश्वास नाही. तरीसुद्धा आघाडीवर राहात लढताना त्यांनी गावागावातून राबवलेली सतर्कता,स्वच्छता, सहकार्य, सामंजस्य यामुळे आजपर्यंत तरी ग्रामीणभागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. त्यामुळेच त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

28 ग्रामपंचायतीत महिला उपसरपंच

राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या गेलेल्या कागल तालुक्यात एकूण 83 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 49 ग्रामपंचायतीत महिला सरपंच तर 28 ग्रामपंचायतीत महिला उपसरपंच आहेत. 17 ग्रामपंचायती अशा आहेत तेथे सरपंच, उपसरपंच पदावर महिला कार्यरत आहेत. कोरोना विरूध्दाच्या लढाईत त्यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे.

सर्वाधिक महिला सरपंच नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघात

नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व एका महिलेकडेच आहे. मतदारसंघात एकूण 19 गावे येतात. यापैकी 13 गावांतून महिला सरपंच तर 5 ठिकाणी महिला उपसरपंच आहेत. शिवाय 4 ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंचपदी महिलाच कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT