Under the shadow of the fear of group infection 
कोल्हापूर

समूह संसर्गाचा धास्तीने कूर ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली

अरविंद सुतार

कोनवडे : कूर (ता. भुदरगड) येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कूर-दारवाड परिसरात समूह संसर्गाचा धास्तीने भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत वृद्धेच्या संपर्कातील 11 जणांना संस्थात्मक अलगीकरण केले आहे. स्थानिक महिलेस संसर्ग झाल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. 

संसर्ग झालेल्या मृत महिलेस श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला व उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. मृत महिलेच्या संपर्कातील 11 व्यक्तींना गारगोटी येथील कोविड रुग्णालयात स्वॅब घेऊन अलगीकरण केले आहे. 

संबंधित महिलेच्या मुलाचे दारवाड (ता. भुदरगड) येथे मुख्य रस्त्यावर सोन्या-चांदीचे ज्वेलरीचे दुकान आहे. दारवाडसह परिसरातील अनेकांशी त्यांचा संपर्क आला असण्याची शक्‍यता आहे. त्या चिंतेने परिसरात शुकशुकाट आहे. प्रांत डॉ. संपत खिलारी यांनी कूरसह परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. ग्राम दक्षता समितीने गावात अत्यावश्‍यक सेवा वगळता गावात बंद पुकारण्यात आल्याचे सरपंच अनिल हळदकर, उपसरपंच सौ. कांबळे, तलाठी विशाल पाटील, पोलिसपाटील युवराज धोंगडे यांनी सांगितले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT