Bharti Pawar Esakal
कोल्हापूर

राज्यात सरकार आहे तरी कोठे? आघाडीवर आरोग्यमंत्र्यांची टीका

राज्यात आतापर्यंत फुटीच्या तीन घटना घडल्या; डॉ. भारती पवार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : परीक्षांचे पेपर फुटतात, एस. टी.चा संप मिटत नाही, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही, सरकार कोणत्याच प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही, महाविकास आघाडीच्या केवळ घोषणाच आहेत, कृती काहीच नाही, अशी खरमरीत टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी केली. आपल्या खासगी दौऱ्यासाठी डॉ. पवार कोल्हापुरात (Kolhapur) आल्या होत्या. काल(ता.२६) त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकाराबद्दल डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘आरोग्य विभागाचे पेपर फुटल्यावर मला विद्यार्थ्यांचे फोन आले. पेपरला बसल्यावर पेपर फुटल्याचे त्यांना सांगितले. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. राज्यात आतापर्यंत अशा तीन घटना घडल्या. पण, सरकारने कोणतेच ठोस पाऊस उचललेले नाही. जी कंपनी ब्लॅकलिस्टमध्ये आहे, तिलाच परीक्षेच्या नियोजनाची जबाबदारी दिली जाते. सरकारचे प्रश्नांकडे लक्षच नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळाले नाहीत. एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप अजून मिटला नाही. पेपर फुटीच्या घटना घडतात. पण, निर्णय होत नाही. राज्यात सरकार आहे तरी कोठे? या सरकारच्या नुसत्या घोषणाच आहेत. प्रत्यक्ष कृती नाही.’’ या वेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, विजय जाधव, गायत्री राऊत, विजय अग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

तुम्ही सुरक्षित, तर सर्व सुरक्षित

नागरिकांना आवाहन करताना डॉ. पवार म्हणाल्या, ‘‘लसीकरण करून घ्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. तुम्ही सुरक्षित असाल तर सर्व सुरक्षित असतील. गर्दी टाळा. तुमची आणि इतरांची काळजी घ्या. लहान मुलांसाठीही लवकरच लस उपलब्ध करून दिली जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील लसीकरण होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT