Unruly Parking At Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला पुन्हा बेशिस्त पार्कींग

अजित माद्याळे

गडहिंग्लज : पोलिस विभागाने गेल्या वर्षभरापासून बेशिस्त पार्कींग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. वाहनांना टोचण करणाऱ्या यंत्रणेच्या निविदेची मुदत संपल्याने महिना-दीड महिन्यापासून ही कारवाई थांबली आहे. यामुळे शहरातील पार्कींगच्या शिस्तीला तिलांजली मिळाली आहे. बेशिस्त पार्कींगसंदर्भात पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' असेच चित्र शहरात पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. 

शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून येथील पोलिसांनी व नगरपालिकेतर्फे मेन रोडवर सम-विषम पार्कींगच्या उपाययोजनेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठविला. तत्कालीन अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या उपाययोजनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहरासाठी स्वतंत्र वाहन टोचण यंत्रणा कार्यान्वित झाली. वर्षभरापासून ही यंत्रणा सुरू राहिल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी काहीशी दूर झाली होती. विशेष करुन बेशिस्त पार्कींग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहिम या उपाययोजनेतंर्गत सुरू होती. 

दरम्यान, संबंधित वाहन टोचण यंत्रणेच्या निविदेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपल्याने एक-एक महिन्याची मुदत वाढवून ती फेब्रुवारीपर्यंत चालविली. त्यानंतर निविदा प्रक्रिया थांबल्याने टोचण यंत्रणेचे काम थांबले आहे. महिना-दीड महिना उलटला तरी अद्याप नवी निविदा मंजूरीचा पत्ता नाही. पोलिस खात्याचे इन्स्पेक्‍शन सुरू असल्याने हे काम थांबल्याचे सांगण्यात येते. परिणामी वाहतुक कोंडीत भर पडत आहे. रस्त्याकडेला हातगाडावाले विक्रेत्यांची संख्या अधिक झाली आहे. या साऱ्या प्रकारामुळे मुख्य रस्ता अरुंद होत चालला असून पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या गडहिंग्लजकरांना अनुभवायला मिळत आहे. 

कारवाईपुरती शिस्त 
गडहिंग्लज सुसंस्कृत शहर आहे. परंतु, बेशिस्त वाहतुकीमुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होत आहे. कारवाई सुरू होती तोपर्यंत पार्कींगला शिस्त लागली. आता केवळ महिनाभर तांत्रिक अडचणीमुळे कारवाई थांबल्याने लगेचच पुन्हा बेशिस्तीचे वातावरण पहायला मिळत आहे. सध्या वाहतूक पोलिस चालक परवाना, विमा नसणे, अल्पवयीन चालकांवर कारवाई सुरू केली आहे. याबरोबरच पार्कींगच्या शिस्तीकडेही पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी वाढत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT