Upload the readings, otherwise the average bill 
कोल्हापूर

रिडिंग अपलोड करा, अन्यथा सरासरी बिल

अवधूत पाटील

गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे दरमहा वीज ग्राहकांच्या घरी जाऊन मीटर रिडिंग घेतले जाते. एखादे घर बंद असेल तर त्याला मोबाईल ऍपवर स्वत:च मीटर रिडिंग अपलोड करण्याचा पर्याय दिला जातो. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरोघरी जाऊन रिडिंग घेणे शक्‍य नाही. त्यामुळे सर्वच ग्राहकांना मोबाईल ऍपवर मीटर रिडिंग भरावे लागणार आहे. हा पर्याय न स्वीकारल्यास वीज बिलाची सरासरी आकारणी केली जाणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याला रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली, त्याचा परिणाम सर्वच घटकावर जाणवत आहे. सारेच व्यवहार ठप्प झाले आहेत. विद्युत महावितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांना वीज पुरविली जाते.

वापरलेल्या विजेपोटी ग्राहकाकडून बिलाची आकारणी केली जाते. त्यासाठी दरमहा ग्राहकांच्या घरी जाऊन मीटरचे रिडिंग घेतले जाते. मात्र, संचारबंदीमुळे घरोघरी जाऊन मीटर रिडिंग घेणे शक्‍य नाही. त्यामुळे महावितरणने ही प्रक्रियाच बंद केली आहे. त्याऐवजी ग्राहकांना मोबाईल ऍपद्वारे आपल्या मीटरचे रिडिंग अपलोड करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, बहुतांश ग्राहकांकडून मोबाईल ऍपचा वापर केला जात नाही. त्यामुळे ग्राहकांना हे ऍप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. जर मोबाईल ऍपद्वारे मीटर रिडिंग अपलोड केले नाही तर सरासरी वीज बिल पाठविले जाणार आहे. 

थकबाकी वाढणार... 
थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून मार्च महिन्यात विशेष मोहीम राबविली जाते. पण, मार्च महिन्याच्या मध्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरवात झाली. वीज बिल ऑनलाइन भरणाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे वीज बिलाच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता एप्रिल महिन्यातही वसुलीला फारसा वाव नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे थकबाकीत भरच पडण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्राहकांना मोबाईल ऍपद्वारे मीटर रिडिंग अपलोड करणे किंवा सरासरी वीज बिलाचा पर्याय दिला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पूर्वीप्रमाणेच मीटर रिडिंग घेतले जाईल. यामध्ये जर सरासरी वीज बिलाची आकारणी अधिक झाली असेल तर जादाची रक्कम पुढील बिलातून वजा केली जाणार आहे. 
- सुरेंद्र भोये, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : कोकण रेल्वेचं नवं ॲप! प्रवाशांना एका क्लिकवर मिळणार गाड्यांची माहिती

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT