urja savad dheyvedyashi program from two march in kolhapur 
कोल्हापूर

‘ऊर्जा : संवाद ध्येयवेड्यांशी’ २ मार्चपासून...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २ मार्चपासून सलग चार दिवस संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तुत ‘ऊर्जा : संवाद ध्येयवेड्यांशी’ हा प्रेरणादायी संवाद रंगणार आहे. 
या अनोख्या संवाद मालिकेची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन सहाव्या वर्षीच्या संवाद मालिकेचे पहिले पुष्प गुंफतील. शिवाजी विद्यापीठाच्या ‘राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात’ रोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची पर्वणी मिळणार आहे.दरम्यान, सलग सहाव्या वर्षी हा कार्यक्रम होणार असून, नामवंत वक्‍त्यांची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. आपापल्या क्षेत्रात यशोलौकिकाचे शिलेदार ठरलेली ही मंडळी प्रत्येकातील नवचेतना जागवताना नेटाने पुढे जाण्यासाठीची ऊर्जाही देणार आहेत. कार्यक्रमाला सर्वांसाठी विनामूल्य खुला प्रवेश असेल. 

‘सकाळ’ने पाच वर्षांपूर्वी या अनोख्या उपक्रमाला प्रारंभ केला. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, 
उद्योजिका जयंती कठाळे, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकार सुभाष घई, प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, राहुल बोस, भारत विकास ग्रुप- बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे हणमंतराव गायकवाड, ‘सुपर थर्टी’चे संस्थापक आणि गणितज्ज्ञ आनंद कुमार, ज्ञानेश्‍वर मुळे, प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पटेल, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, दिग्दर्शक अभिनय देव, फ्लेम युनिव्हर्सिटीचे संस्थापक संचालक पराग शहा, ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, अभिनेता श्रेयस तळपदे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा आदींशी दिलखुलास संवाद साधण्याची संधी मिळाली होती. चला तर मग, आजच वेळेचे नियोजन करूया. २ ते ५ मार्चची सायंकाळ नवप्रेरणादायी करूया...! 

प्रायोजक असे...

  •   टायटल स्पॉन्सर - संजय घोडावत विद्यापीठ
  •   मुख्य प्रायोजक - तनिष्क ज्वेलर्स
  •   सहप्रायोजक - मार्व्हलस्‌ इंजिनिअर्स प्रा. लि., चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, ब्रिलियंट प्रोफेशनल ॲकॅडमी, अरुण नरके फाउंडेशन
  •   हॉस्पिटॅलिटी पार्टनर - हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. 

शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य 

‘ऊर्जा- संवाद ध्येयवेड्यांशी’ उपक्रमाला गेली सहा वर्षे शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे. विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात रोज सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मुलाखती रंगतील. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था असेल. 

दृष्टीक्षेपात..

  •   राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात रोज सायंकाळी सहाला संवादाला प्रारंभ
  •   ‘सकाळ’च्या कार्यालयात लवकरच मोफत प्रवेशिका उपलब्ध
  •   सन्मानिका असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य 
  •   गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगचे नेटके नियोजन
  •   अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज (९५५२५८१९१८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : आठ जुलैला होणार संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT