कोल्हापूर

सकाळी सात ते रात्री दहापर्यंत लसीकरण; जिल्हाधिकारी राहुल रेखावार

आजपासून होणार कडक अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवा (व्हेरिएंट) विषाणूचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यात आणि शहरात ज्या-ज्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, त्या ठिकाणी बदललेल्या वेळेनुसार सोमवारपासून (ता. ६) लसीकरण केले जाईल.

श्री. रेखावार म्हणाले, ‘‘जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे. लोक लसीकरणासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लोकांकडून लसीकरण करून घेतले जात आहे. जिल्ह्यातील केंद्र वाढवण्याऐवजी लसीकरणाच्या नियोजित वेळेतच वाढ करून लोकांची सोय केली आहे. पूर्वी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत दिली जाणारी लस उद्यापासून सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत दिली जाईल. जिल्ह्यात लशीचा पुरवठाही चांगला आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांनी पहिला डोस घेतलेला नाही, त्यांनी तातडीने डोस घेऊन जिल्ह्या नव्या व्हेरिएंटला दूर ठेवूया, असे आवाहनही त्यांनी केले.

ते म्हणाले, ‘‘ज्यांनी-ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोसही पूर्ण केला आहे. त्यांच्यावर नवीन व्हेरिएंटचा प्रभाव सध्या तरी दिसून आलेला नाही. ओमिक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला. या देशात ज्यांनी दोन लशीचे डोस घेतले आहेत. त्यांना ओमिक्रॉनचे जुजबी आणि बरी होणारी लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे लसीकरणाशिवाय पर्याय नाही.

मुस्लिम धर्म गुरूंचा पुढाकार

जिल्हा आणि शहरातील मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी लस घेतली आहे. मश्‍चिदीबाहेर लसीकरण केंद्र उभारून लसीकरण केले आहे. हेच धर्मगुरूही घरोघरी जावून समाज बांधवांना लसीकरणाचे आवाहन करत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजासह इतर धर्मीयांनीही तत्काळ लस घेऊन कोल्हापूर जिल्हा लसीकरणात सक्षम केला पाहिजे, असेही आवाहन श्री. रेखावार यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्र

  1. ग्रामीण भागात -२४४

  2. शहरात - २२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT