vaccine of corona testing on 7 people in kolhapur yesterday under medical precautions 
कोल्हापूर

कोल्हापुरात पहिल्या दिवशी चाचणीचा डोस सात जणांना

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी सात स्वयंसेवकांना हे डोस देण्यात आले. आजपासून १०० स्वयंसेवकांना लशीच्या चाचणीचे डोस देण्यात येतील. दहा दिवसांत एक हजार स्वयंसेवकांना डोस देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सोमवारी (२१) रात्री उशिरा चाचणीचे डोस देण्यासाठीची परवानगी मिळाल्यावर आज प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) कोरोना प्रतिबंधक एक हजार लशीचे डोस चाचणीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार क्रोम कंपनीच्या माध्यमातून चाचणीसाठी डोस देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. प्रतिदिन १०० जणांना डोस देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार डिसेंबरअखेर एक हजार डोस दिले जातील. आज पहिल्या दिवशी २१ जणांनी त्यासाठी नोंद केली. त्यापैकी सात जणांना डोस देण्यात आले आहेत. 

पहिला डोस ७७ वर्षीय स्वयंसेवक माजी सैनिक हरी तुकाराम लाड यांना देण्यात आला. विशेष म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींनीही डोस घेण्यासाठी उत्साह दाखविला आहे. ‘सीपीआर’मध्ये क्रोम वॉर्डजवळच ही व्यवस्था केली. यासाठी ‘सीपीआर’ची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. काल रात्री उशिरा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ही चाचणी घेण्यासाठी ‘हिरवा कंदील’ दाखविला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चाचणी लस देण्याची परवानगी मिळावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार काल रात्री याला परवानगी मिळाली. जिल्हाधिकारी देसाई यांनी काल सकाळीही डॉ. लहाने यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. त्यानुसार क्रोम कंपनीच्या माध्यमातून हे डोस देण्यात आले.

"आजपासून लसीकरणाची चाचणी प्रक्रिया सुरू झाली आहे. डोस देण्याबाबतची सर्व सुरक्षितता व काळजी घेतली जात आहे."

- दौलत देसाई, जिल्हाधिकारी 

"डोस घेतल्याने कोणताही ‘साईड इफेक्‍ट’ जाणवत नाही. माझ्या प्रकृतीत कोणताही बदल जाणवत नाही."

- हरी तुकाराम लाड, लस घेणारे माजी सैनिक

"कोरोना महामारीला रोखण्यासाठी हा डोस देण्यात येणार आहे. एक हजार स्वयंसेवकांना डोस दिला जाईल. त्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. आणखी स्वयंसेवकांनी नोंदणी करावी. ही चाचणी लस पूर्णपणे मोफत दिली जाईल. यासाठी जिल्हा प्रशासन, सीपीआर हॉस्पिटलने चांगला पुढाकार घेतला आहे."

- डॉ. धनंजय लाड, क्रोम कंपनी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

What a Catch! मार्को यान्सेनने दोन बोटावर घेतलेल्या झेलची हवा! फलंदाजासह सारेच स्तब्ध; तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी, Video

Maharashtra Ganesh Visarjan Live: गुरुजी तालीम मंडई चौकात दाखल

Ratnagiri: आजीचा मोबाईल घेऊन शाळेत गेली, पालक ओरडताच आठवीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Vengurla Gold Jewellery Theft : हिरेजडित सोन्याच्या अर्धा किलो दागिन्यांवर डल्ला दाभोली-मोबारवाडीत बंद घर फोडले सुमारे अर्धा कोटीचा ऐवज; भागात खळबळ

SCROLL FOR NEXT