vadange crime case Including two husband mother in law kolhapur 
कोल्हापूर

बहिणीबरोबरचे भांडण मिटवण्यासाठी घरी बोलावून मेहुण्यालाच केली मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बहिणीबरोबरचे भांडण मिटवण्यासाठी घरी बोलावून मेहुण्याला मारहाण करण्याची घटना वडणगे (ता. करवीर) येथे आज दुपारी घडली. भांडणात प्रकाश आनंदा जगताप (वय 38, रा.ब्लॉक नं.21, रुम नं. 16, जुनी पोलिस लाईन, पोलिस मुख्यालयासमोर) जखमी झाले आहेत. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

कुमार परशुराम ठमके, हिराबाई परशुराम ठमके (दोघे वडणगे), राधिका बबन देवर्डेकर (रा. नागाव), जयश्री शिवाजी शिंदे (सानेगुरूजी वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार यांचा विवाह प्रकाश यांच्या बहिणीशी झाला. कुमार आणि त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले. त्यानंतर कुमार यांची पत्नी सासरहून निघून गेली. हिराबाई या सासू असून राधिका व जयश्री नणंदा आहेत.

कुमार यांनी प्रकाश यांना फोन करून भांडण मिटवण्यासाठी वडणगे येथील घरी यावे असे सांगितले. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास प्रकाश तेथे गेले. यावेळी ठमके कुटुंबीय आणि प्रकाश यांच्यात वादावादी झाली. हिराबाई आणि जयश्री यांनी प्रकाश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना शिविगाळ केली. कुमार याने प्रकाश यांच्या अंगावर फरशी मारली. घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT