Vandalism of vehicles by a lover for refusing to marry 
कोल्हापूर

लग्नास नकार दिल्याने प्रेमविराकडून वाहनांची तोडफोड

राजेश मोरे

कोल्हापूर  ः उद्यमनगर येथे मुलीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी रिक्षासह दोन वाहनांची तोडफोड केली. घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. 
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः प्रथमेश सतिश शिंगे (रा. यादवनगर), अवि सोडेवाला, शुभम लाळगे, गणेश कांबळे अशी आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, संशयित प्रथमेश शिंगे याची महाविद्यालयात असताना एका मुलीशी ओखळ झाली. त्याने तिच्याकडे लग्न करण्याची मागणी केली. पण तिच्या घरच्यांनी तिला विरोध केला. त्या मुलीचा पाठलाग करून तिलाही विचारणा केली. तरीही नकार मिळाल्यानंतर तो संतप्त झाला. तो शुक्रवारी (ता.11) रात्री साथिदार संशयित अवि सोडेवाला, शुभम लाळगे, गणेश कांबळे असे चौघे जण त्या मुलीच्या दारात गेले. त्यानंतर त्या चौघांनी दारात उभी केलेली रिक्षा व मोटारसायकलची तोडफोड केली. यात सुमारे दहा हजार रूपयाचे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबधित मुलीच्या घरच्यांनी याची तक्रार राजारामपुरी पोलिसात दिली. पोलिस ठाण्यात प्रथमेश, अवि, शुभम, गणेश या चौघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास सहायक फौजदार डी. ठोंबरे करीत आहेत. 


पाठोपाठ दुसरा प्रकार ः 
यादवनगर परिसरात चार दिवसापूर्वी जमावाने दगडफेक करून दोन रिक्षासह मोटारींची तोडफोड केल्याचा प्रकार अद्याप ताजाच असताना हा दुसरा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT