Vande Bharat Express esakal
कोल्हापूर

Good News : वंदेभारत रेल्वे सेवा कोल्हापुरातून लवकरच सुरू करणार; केंद्रीय रेल्वेमंत्री दानवेंचं मोठं आश्वासन

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे रेल्वसेवा जागतिक दर्जाची बनविण्याचे स्वप्न आहे.

सकाळ डिजिटल टीम

मला रेल्वे प्रवासात मंडलिक कमी वेळा भेटले, महाडिक अधूनमधून भेटले. माने क्‍वचितच भेटतात, असेही मुश्रीफ यांनी महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेस प्रवासाची आठवण सांगितली.

कोल्हापूर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे रेल्वसेवा जागतिक दर्जाची बनविण्याचे स्वप्न आहे. त्याचेच प्रतीक असलेली वंदेभारत रेल्वे सेवा (Vande Bharat Express) कोल्हापुरातून लवकर सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी येथे दिले.

कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेसच्या (Mahalakshmi Express) नव्या रूपातील (एलएचबी कोच) रेल्वे सेवेचे श्री. दानवे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून उद्‌घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज टर्मिनन्सवर या सोहळा झाला. खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), धैर्यशील माने, संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे उपस्थित होते.

मंत्री दानवे म्हणाले, ‘हातकणंगले ते इचलकरंजीचा आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर्वेक्षण, डीपीआर तयार झाला. कामही लवकरच सुरू होईल.’ खासदार महाडिक म्हणाले, ‘रेल्वेच्या विविध प्रश्नांवर तिन्ही खासदारांनी एकत्रित पाठपुरावा केला. त्याची दखल घेत रेल्वेमंत्री दानवे यांनी नव्या रूपातील महालक्ष्मी एक्सप्रेसची सेवा सुरू केली. रेल्वे प्रवाशांच्या हितांच्या अन्य मागण्यांची दखल घेतली आहे. जिल्‍ह्याच्या विकासाला बळ देणारी वंदे भारत दोन महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन मिळाले आहे. सह्याद्री एक्‍स्‍प्रेस मुंबईपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

Vande Bharat Express

खासदार मंडलिक यांनी कोल्हापूरकराना अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी जाता येण्यासाठी कोल्हापूर ते अयोध्या एक्‍स्‍प्रेस रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे घातले. दरम्यान, रेल्वे स्थानकावरील लिप्टचे उद्‌घाटनही यावेळी करण्यात आले. सर्वात जास्त मी महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेसने प्रवास करतो. रेल्वे प्रवाशांसह मलाही रेल्वेचा लाभ होणार आहे. मला रेल्वे प्रवासात मंडलिक कमी वेळा भेटले, महाडिक अधूनमधून भेटले. माने क्‍वचितच भेटतात, असेही मुश्रीफ यांनी महालक्ष्मी एक्‍स्‍प्रेस प्रवासाची आठवण सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT