sakal news
sakal news kolhapur
कोल्हापूर

वसंतदादांचा नातू काँग्रेसवर नाराज, तरी स्वीकारणार ‘हे’ पद ?

अजित झळके

सांगली: काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी संधी न देऊन विशाल पाटील यांच्यावर अन्याय केल्याची त्यांच्या समर्थकांची भावना झाली आहे. ती उघडपणे बोलूनही दाखवली जात आहे. या स्थितीत जे हाती आले आहे, त्याचे सोने करून दाखवावे, असाही एक सूर त्यांच्या समर्थकांतून येत आहे. त्यामुळे विशाल पाटील राज्याचे प्रदेश उपाध्यक्षपद स्विकारून काम सुरु करणार, असे संकेत मिळत आहेत. ‘वसंतदादांचा नातू’ नाराज आहे, मात्र तो काँग्रेस सोडून जाण्याच्या मानसिकतेत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

काँग्रेसने राज्यात संघटनात्मक पुनर्बांधणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली नवी टीम तयार केली आहे. त्यात जिल्हाध्यक्षांची नेमणूक झालीच, शिवाय १०४ सचिव आणि २२ उपाध्यक्ष नेण्यात आले आहेत. वसंतदादा पाटील यांचे नातू व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटीले हे संघटनात्मक पद घेण्यासाठी पहिल्यांदाच शर्यतीत होते. त्यांना जिल्‍ह्याचे अध्यक्षपद हवे होते. सध्या ते दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू, आमदार मोहनराव कदम यांच्याकडे होते. त्यावर राज्यमंत्री विश्‍वजीत कदम गटाने दावा केला होता आणि विश्‍वजीत यांचे मावस बंधू आमदार विक्रम सावंत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात ते यशस्वी देखील झाले.

विशाल यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रदेशाचे उपाध्यक्षपद मिळूनही ना जल्लोष केला, ना प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ते काय करणार, याबाबत उत्सुकता होती. हाती आलेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांनी समर्थकांशी याबाबत चर्चा केली असून ते नाराज असले तरी पद स्विकारून काँग्रेसमध्ये नवा झंझावात निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

वसंतदादा पाटील यांना मानणारा गट राज्यभर आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक गावात दादा समर्थक गट आहे. त्याची पुनर्बांधणी त्यांनी करावी, असे त्यांच्या समर्थकांनी आग्रहीपणे सांगितले आहे. प्रदेश पातळीवरील निवडीच्या निमित्ताने विशाल पाटील हे पुन्हा एकदा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात आले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती. त्यामुळे त्यांना स्वाभिमानीचे नेते, असे म्हणून काँग्रेसपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जात होता, तो आता थांबेल, असे काही समर्थकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT