Vasantrao Mulik Said, We Have To Show Strength Again For Concessions Till We Get Reservation Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुन्हा ताकद दाखवुया : वसंतराव मुळीक

अवधूत पाटील

गडहिंग्लज : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे मराठा समाजासमोरील अडचणी वाढल्या आहेत. समाजाला घटनात्मक आरक्षण मिळविण्यासाठी आणि आरक्षण मिळेपर्यंत सवलतींसाठी पुन्हा एकदा ताकद दाखवावी लागणार, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. 

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात गडहिंग्लज, आजरा, चंदगड सकल मराठा समाजाची बैठक झाली. याप्रसंगी मुळीक बोलत होते. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे अध्यक्षस्थानी होते. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली. 

मुळीक म्हणाले, ""मराठा आरक्षणाला स्थगिती मिळून तीन महिने होत आले. आरक्षण दिल्लीशिवाय मिळणार नसले तरी चांगले वकील देण्यासाठी राज्य शासनावर दबाव आणायला हवा. आरक्षण मिळत नाही तोवर विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसह अन्य सवलती मिळविण्यासाठी दबावाचे राजकारण केले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाविरोधातही आंदोलन करावे लागणार.'' 

सावंत म्हणाले, ""मराठा समाजात कधी नव्हे इतकी संभ्रमावस्था आहे. आरक्षणाचा 50 टक्केचा कोटा वाढविण्यासाठी अन्य समुहाना एकत्र घेऊन लढले पाहिजे. मराठा बांधवांनी राजकीय विधानांकडे दुर्लक्ष करावे. नेतृत्व नसताना 58 मोर्चे निघाले आहेत. त्यामुळे तुमचे नेतृत्व नको म्हणण्याची ताकद दाखविली हवी. राजकीय झूल न पांघरता स्वत:च्या ताकदीवर उभा राहिले पाहिजे.'' घोरपडे, प्रा. शिवाजी भुकेले, प्रा. सुनील शिंत्रे यांचीही भाषणे झाली. 

किरण कदम यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट केला. रामचंद्र शिवणे, विद्याधर गुरबे, ऍड. दिग्विजय कुराडे, मारुती मोरे, श्री. सातोस्कर आदी उपस्थित होते. दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले. नागेश चौगुले यांनी आभार मानले. 

गावकुसावर जायला हवे... 
मुळीक म्हणाले, ""मराठा मोर्चावेळी गावागावातून समाजाचे लोक आले होते. आता पुन्हा गावपातळीवर नियोजन करू. गावागावातील लोकांच्या गाठीभेटी घेऊ. समाजात एकोपा कायम ठेवण्यासाठी गावकुसावर जायला हवे.'' 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT