vegetables are available in kolhapur market 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा बाजार समितीत काय आहे भाजी पाल्याची स्थिती...? जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीत आज जवळपास 395 क्विंटलचा भाजीपाला आवक झाली. तर फळांची आवक शुन्य झाली. कांद्याची आवक अवघी 600 क्विंटल झाली. त्यामुळे शहराची गरज भागेल एवढा भाजीपाला आवक जरूर झाली आहे. त्यामालाचा उठावही चांगल्या प्रकारे झाला. कोणत्याही भाजीपाल्याची भाववाढ झालेली नाही. त्यामुळे भाजीपाल्याचा तुटवडा नाही. अशी माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली.

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर व राज्य मार्गावरील वाहतुकही बंद झाली. अशात राज्यातील काही जिल्ह्यातील नाका बंदी जोरदार आहे. याचा धसका घेत काल बुधवारी, मंगळवारी परराज्यातून येणारी भाजीपाल्याची वाहतूक तुलनेने कमी होती. त्यात आज तिसऱ्या दिवशी काही प्रमाणात वाढ झाली कवठेमहंकाळ, हातकणंगले, गोकाक, शिरोळ, चिक्कोडी आदी भागातून भाजीपाल्याच्या गाड्या पहाटेच्या वेळी आल्या. त्यानुसार सकाळी सहा ते सकाळी 9 वाजेपर्यंत भाजीपाल्याचे सौदे झाले. शहरातील किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी हा भाजीपाला खरेदी केला तोच भाजीपाला कांहीनी गल्ली बोळात फिरून विकला तर काहींनी रस्त्याकडेला महापालिकेने नेमुन दिलेल्या ठिकाणी विक्रीसाठी नेला. 

वाचा - कोरोना मुक्तीसाठी कोल्हापुर जिल्ह्यात राबतेय 13 हजार कर्मचाऱ्यांची फौज... 

भाजीपाल्याच्या गाड्या पोलिसांकडून अडविल्याची हुल उठली होती, तसेच जिल्हानाका बंदी असल्याने सोलापूर, सातारा, पुणे, बेळगाव आदी जिल्ह्यातील ग्रामीण शेतीमाल दोन जिल्ह्ये ओलांडून कोल्हापूरात येणेही जवळपास थांबले आहे. त्यावर पर्याय म्हणून भाजीपाला ज्या गावातील आहे. त्यागावातील ग्रामपंचायतीचे पत्र घेऊन काही शेतकरी भाजीपाला घेऊन येत आहेत. अशा गाड्यांवर अत्यावश्‍यक सेवेतील भाजापाला वाहतूक असे फलक लावले आहेत. त्यामुळे काहीं गाड्या आज कोल्हापूरात पोहचू शकल्या आहेत. 

आजची आवक अशी 

  • भाजीपाला 395 - क्विंटल 
  • कांदा 600 - क्विंटल 
  • बटाट 522 - क्विंटल 
  • फळे 0 - आवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune–Mumbai Expressway Gas Leak: पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर लीक झालेला गॅस कोणता? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम अन् वापर

Mumbai Crime: कुत्रीच्या किंकाळ्या अन्..., मुंबईत माणुसकीला काळिमा; मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

ऑनलाईन गेम्सचा मुलांच्या मेंदूवर थेट परिणाम! नकळत कसे जाळ्यात अडकतात, वाचा धक्कादायक सत्य

Pune : लग्नाची बोलणी सुरू असतानाच काळाची झडप! बँकेतील लेखापाल युवकाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने 'रेबीज'ने मृत्यू, खामगाववर शोककळा

Jowar Snacks: ऑफिसमध्ये काहीतरी क्रिस्पी खावंसं वाटतंय? मग डब्ब्यात ठेवा ज्वारीच्या पिठाचे 5 चविष्ट स्नॅक्स

SCROLL FOR NEXT