कोल्हापूर

लॉकडाउनमध्ये टेरेसवर पिकवला भाजीपाला 

प्रकाश नलवडे

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात हलसवडे (ता. करवीर) येथील सरपंच संगीता प्रफुल कांबळे यांनी टेरेसवर भाजीपाल्याची बाग फुलवली. बागेतून रोज ताजी भाजी मिळते. यातून महिन्याला एक हजार ते दीड हजारांची बचत झाली. 

पिकावरील कीटकनाशके, रासायनिक खते याचा वापर होत आहे, त्यामुळे भाजीपाला ही प्रदूषित होत आहे, हे लक्षात घेऊन सरपंच कांबळे यांनी शेणखत आणि गोमूत्र वापरून भाजीपाला पिकवला आहे. घराच्या दुसऱ्या मजल्यावर 30 बाय 26 चा टेरेस आहे. 

पती प्रफ्फुल आणि दोन मुलांनी ही मदत केल्याने ही त्यांची टेरेस गार्डन फुलली आहे. टेरेसवर 10 बाय 10 प्लास्टिक कागद अंथरला. शेतातून काळी माती आणली, त्यात शेणखत गोमूत्र मिसळून वाफे तयार केले. सभोवताली विटा लावल्या. सुरुवातीला मिरची, दोडका, फ्लॉवर रोपे लावली. मोकळ्या प्लास्टिक बादल्या आणून त्यात माती, शेणखत घालून रोपे लावली. टेरेसवर बांबूच्या साह्याने मांडव घातला. जानेवारीत त्यांनी याला सुरवात केली. दीड महिन्यानंतर भाजी सुरी झाली. त्यांना रोज दोडका, वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, मिरची, कोथिंबीर, कांदे, मेथी, कारले, बीट, मुळा, फ्लॉवर, पोकळा हा भाजीपाला पिकवला जातो. स्वयंपाक घरातील निघणारा कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते. 
एका बादलीत किचन वेस्ट टाकून खत केले जाते. 

टेरेस गार्डनमधून विषमुक्त भाजीपाला मिळतो. महिन्याला एक ते दीड हजारांची बचत होते आणि मोकळा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्याचा आनंद मिळाला. सर्वांनी अशाप्रकारचा भाजीपाला तयार केला तर आरोग्य चांगले राहील. 
- संगीता कांबळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT